बॉलिवूड अभिनेत्रीची वाढदिवसानिमित्त ड्रग्ज पार्टी, मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये अटक

बॉलिवूड अभिनेत्रीला मित्रासोबत अटक करण्यात आली. हॉटेलच्या एका रुममध्ये ती चरस पित असल्याची माहिती आहे

बॉलिवूड अभिनेत्रीची वाढदिवसानिमित्त ड्रग्ज पार्टी, मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये अटक
बॉलिवूड अभिनेत्रीच्या ड्रग्ज पार्टीतील फोटो

मुंबई : वाढदिवसानिमित्त ड्रग्ज पार्टी करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीला मुंबईत अटक करण्यात आली आहे. सांताक्रुझमधील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये संबंधित अभिनेत्री मित्रांसोबत ड्रग्ज पार्टी करताना रंगेहाथ सापडली. बॉलिवूडमध्ये लहान मोठे रोल करणाऱ्या अभिनेत्रीला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं. (Bollywood Actress Arrested red handed in Drugs Party at Mumbai Five Star Hotel)

वाढदिवसानिमित्त ड्रग्ज पार्टी

मुंबईतील सांताक्रुझमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी सुरु असल्याची खबर मुंबई पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास धाड घातली. त्यावेळी बॉलिवूड अभिनेत्री मित्रासोबत वाढदिवसाची पार्टी साजरी करत होती.

अभिनेत्रीला मित्रासोबत अटक

पार्टीमध्ये ड्रग्जचा वापर होत असल्याची सूचना पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकून या प्रकाराची शहानिशा केली. त्यानंतर अभिनेत्रीला मित्रासोबत अटक करण्यात आली. हॉटेलच्या एका रुममध्ये ती चरस पित असल्याची माहिती आहे. ‘आज तक’ वृत्तवाहिनीने यासंदर्भात बातमी दिली आहे.

जामिनावर मुक्तता

तिचा साथीदार आशिक हुसैन यालाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सांताक्रुझ पोलिसांनी एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सोमवारी दोघांना कोर्टात हजर केलं असता जामिनावर मुक्तता करण्यात आली. तिने आतापर्यंत बॉलिवूडसह काही तेलुगू चित्रपटातही काम केलं आहे.

एनीसीबीची बेकरीवर कारवाई

एनसीबी अधिकाऱ्यांना मुंबईच्या मालाड येथील एका बेकरीतून ड्रग्जचा पुरवठा केला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारावर दोन दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांनी कारवाई केली होती. अधिकाऱ्यांनी संबंधित बेकरीत थेट छापा टाकला. यावेळी एका डब्ब्यात अधिकाऱ्यांना 160 ग्रॅम गांजा मिळाला. पोलिसांनी बेकरीतील कर्मचाऱ्यांची चौकशी केला तेव्हा सर्व प्रकार उघड झाला

संबंधित बेकरीतून केक आणि पेस्ट्रीद्वारे हाय प्रोफाईल परिसरातील नागरिकांना ड्रग्ज पुरवठा केला जायचा. एनसीबी अधिकाऱ्यांनी बेकरीतील सर्व ड्रग्ज ताब्यात घेतलं. तसेच बेकरीतील तिघांना अटक केली. याप्रकरणाचा पुढील तपास अधिकारी करत आहेत. तसेच या कारवाईतून ड्रग्ज माफियांच्या आणखी मोठ्या जाळ्याचा भंडाफोड होण्याचा अंदाज आहे.

संबंधित बातम्या : 

आधी प्रेमाचं नाटक, नंतर पॉर्न व्हिडीओ बनवत ब्लॅकमेलिंग, मिसेस राजस्थानचं घृणास्पद कृत्य

बेकरीच्या आड ड्रग्जचा धंदा ! केक आणि पेस्ट्रीतून हाय प्रोफाईल लोकांना गांजाचा पुरवठा

(Bollywood Actress Arrested red handed in Drugs Party at Mumbai Five Star Hotel)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI