AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane Crime : ठाण्यातील हॉटेलमध्ये ‘त्या’ रात्री काय घडलं, जेवायला आले अन् अचानक का काढले चॉपर?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये रात्रीचा हॉटेल व्यावसायिक आणि वेटरवर खुलेआमपणे चॉपरने हल्ला करण्यात आला. नेमकं असं काय झालं होतं की आरोपींनी थेट चॉपर काढत हल्ला केला.

Thane Crime : ठाण्यातील हॉटेलमध्ये 'त्या' रात्री काय घडलं, जेवायला आले अन् अचानक का काढले चॉपर?
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Nov 23, 2023 | 4:53 PM
Share

मुंबई : ठाण्यामध्ये चॉपर गँग सक्रिय झालेली पाहायला मिळत आहे. आझाद नगरमध्ये रात्रीच्या वेळी हॉटेल व्यावसायिक आणि वेटरवर चॉपरने हल्ला करण्यात आलाय. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ठाण्यामध्ये आता कोयता गँगनंतर चॉपर गँग सक्रिय झाली असल्याचं दिसत आहे.

ठाण्यात ‘त्या’ रात्री काय घडलं?

ठाण्यामधील ब्रह्मांड आझाद नगरमध्ये सागर गोल्डन हॉल टॉप नावाच्या हॉटेलमध्ये रात्री 11.30 वाजताच्या सुमारास हा राडा झालेला पाहायला मिळाला. आरोपी ओंकार भोसले, अभि पाटील आणि त्याचा मित्र हॉटेलमध्ये बसले होते. तिघांनी ऑर्डर दिली मात्र ऑर्डर यायला काही वेळ लागला. आरोपींनी त्यानंतर टेबल उलटा करून नुकसान करायला सुरूवात केली.

ऑर्डरला उशिरा झाला म्हणून रागाच्या भरात आरोपींनी वेटरवर त्यासोबत हॉटेल व्यावसायिकावरही थेट चॉपरने हल्ला केला. भर रात्री हल्ला करून आरोपी पसार झाले. आरोपी पसार झाले असून कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. चुकून जर तो चॉपर वेटर किंवा हॉटेल व्यावसायिकाच्या मानेवर बसला असता तर जाग्यावरच त्यांना आपला जीव गमवावा लागला असता.

दरम्यान, या सर्व प्रकाराचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आरोपी क्रूरपणे हातातील चॉपर  वेटर आणि हॉटेल व्यावलायिकावर चालवत आहे. राजाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नसल्याचं या प्रकरणातून दिसून आलं आहे.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत