AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jaipur Murder : धक्कादायक ! मोबाईल चार्जरने नवऱ्याचा गळा घोटला; मृतदेह कबरीतून बाहेर काढल्यानंतर सत्य उजेडात

मृतदेहाच्या पोस्टमार्टममध्ये हत्येची पुष्टी झाली आणि पोलिसांनी 12 जुलै रोजी मदीनाला अटक केली. मदीना हिचे परिसरातील एका ग्रामीण डॉक्टरसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोपही तिच्या सासूने केला होता.

Jaipur Murder : धक्कादायक ! मोबाईल चार्जरने नवऱ्याचा गळा घोटला; मृतदेह कबरीतून बाहेर काढल्यानंतर सत्य उजेडात
दौंडमध्ये अज्ञात कारणावरुन व्यक्तीची हत्याImage Credit source: tv9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jul 14, 2022 | 2:24 AM
Share

जयपूर : पती-पत्नीच्या नात्यात संशय शिरला कि तो संसार उद्ध्वस्त होतोच. त्याचबरोबर दोघे एकमेकांच्या जीवावरही उठू शकतात. अशाच संशयातून पत्नीने पती (Husband)चा खून (Murder) केला. विशेष म्हणजे तिने मोबाईल चार्जर (Mobile Charger)ने पतीचा गळा आवळला आणि त्याला जीवे ठार मारले. राजस्थानमधील फतेहपूर शेखावती येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. पतीचा मृतदेह कबरीतून बाहेर काढल्यानंतर हे धक्कादायक सत्य उजेडात आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सुरुवातीला या पुरुषाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवून त्याचा दफनविधी करण्यात आला होता. पण महिलेवर तिच्या सासूने संशय घेतला. त्यानंतर तिनेच हत्या केल्याची बाब उघडकीस आली. हत्येनंतर आठ दिवसांनी पोलिसांनी मृतदेह कबरीतून बाहेर काढून तपास केला. या तपासातून महिलेचे पितळ उघड होताच तिने चौकशीत पतीच्या हत्येबाबत कबुली दिली.

हत्या झालेला इसम हा पत्नीसमोर दुसऱ्या महिलेशी गप्पा मारायचा!

फतेहपूर शेखावटी येथील रहिवासी असलेल्या मकसूदचा सुमारे सहा वर्षांपूर्वी आरोपी मदिनासोबत विवाह झाला होता. तो मकसूद गावातच दागिने बनवण्याचे काम करायचे. त्याचे दुसऱ्या महिलेशी संबंध होते. तो पत्नीसमोरच त्या महिलेशी अश्लील गप्पा मारायचा. मदीनाला पतीच्या या कृत्यांचा खूप राग आला होता. त्याच रागातून ती अनेक दिवसांपासून पतीला मारण्याची योजना आखत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 जुलै रोजी आरोपी मदिना ही पती मकसूद आणि सासूसोबत गावापासून काही अंतरावर एका लग्नाला गेली होती.

मकसूद दुपारी दोनच्या सुमारास लग्न आटोपून घरी परतला. त्यानंतर सुमारे एक तासाने म्हणजे दुपारी 3 वाजता मदिना घरी परतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यावेळी घरात फक्त मदिना आणि तिचा पती मकसूद हे दोघेच होते. मकसूदला घरात झोपलेले पाहून मदीनाने आधी साडीने त्याचा गळा दाबला. नंतर मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केला. नंतर पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे मदिनाने भासवले. मकसूदचा लहान भाऊ मुस्तफा दुपारी चार वाजता घरी परतला तेव्हा मदीनाने त्याला मकसूदने आत्महत्या केल्याचे सांगितले. मकसूद तिला मारहाण करायचा, असे तिने पोलिसांना सांगितले.

पुरावा नष्ट करण्यासाठी दफनविधी उरकला होता!

‘आज तक’च्या वृत्तानुसार, पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी कुटुंबीयांनी मकसूदला कब्रस्तानात पुरले होते. काही दिवसांनंतर मदिनावर तिच्या सासूने संशय घेतला. त्याआधारे पोलिसांनी मदीनाची चौकशी केली. त्यात तिने घाबरून पतीच्या हत्येचा कट रचल्याचे मान्य केले. कुटुंबीयांनी 9 जुलै रोजी पोलिसांना खबर दिली होती. त्यानंतर मकसूदचा मृतदेह कबरीतून बाहेर काढण्यात आला होता. मृतदेहाच्या पोस्टमार्टममध्ये हत्येची पुष्टी झाली आणि पोलिसांनी 12 जुलै रोजी मदीनाला अटक केली. मदीना हिचे परिसरातील एका ग्रामीण डॉक्टरसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोपही तिच्या सासूने केला होता. मकसूदच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, मदीना आणि डॉक्टर यांनी मिळून मुलाची हत्या केली. तपासाअंती पोलिसांनी या घटनेत डॉक्टरचा सहभाग असल्याचे नाकारले आहे. (Wife kills husband by strangulation with mobile charger in Jaipur)

Follow Us
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्ध तास बैठक, या भेटीत...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC केंद्राबाहेर मोठा गोंधळ
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
Pune-Mumbai : द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन