बायको माझा सेक्ससाठी छळ करते, अश्लील व्हिडिओ पाठवून त्यात दाखवतात तसं…नवऱ्याचा धक्कादायक खुलासा

पती पत्नीला त्रास देतो,तिचा छळ करतो. महिलेला मानिसक यातना सहन कराव्या लागतात अस आतापर्यंत आपण अनेकदा ऐकलं आहे. पण एक वेगळच प्रकरण समोर आलं आहे. त्यात नवऱ्याने बायकोवर सेक्ससाठी छळ करते असा आरोप केला आहे. सविस्तर जाणून घ्या हे प्रकरण.

बायको माझा सेक्ससाठी छळ करते, अश्लील व्हिडिओ पाठवून त्यात दाखवतात तसं...नवऱ्याचा धक्कादायक खुलासा
husband Wife
Image Credit source: AI Image
| Updated on: Apr 02, 2026 | 9:36 AM

पती पत्नीचा छळ करतो, तिला त्रास देतो. म्हणून पत्नी पोलीस स्टेशनमध्ये गेल्याचं आतापर्यंत आपण ऐकून आहोत. पण एक उलटं प्रकरण समोर आलय. यात नवऱ्याने बायकोवर छळ करण्याचा, लैंगिक गैरवर्तनाचा, फसवणूक आणि जबरदस्तीने घराबाहेर काढण्याचा आरोप केला आहे. सासू-सासऱ्यांचा सारखा आमच्या संसारात हस्तक्षेप असतो. त्यामुळे आमच्यात भांडणं होतात असही या 37 वर्षीय व्यक्तीने आरोप करताना म्हटलं आहे. बंगळुरुमधील हे प्रकरण आहे. तक्रारदाराच्या एफआयआरनुसार त्याचं 31 वर्षीय महिलेसोबत बंगळुरुमध्ये लग्न झालं. जक्कुरुमध्ये येथे हे जोडपं राहत असताना सासूचा त्यांच्या संसारात हस्तक्षेप सुरु होता. माझ्या मुलीला तू सोडून दे, तिच्यासाठी मला तुझ्यापेक्षा दुसरा चांगला मुलगा बघता येईल असं सासू सारखी म्हणायची. त्याशिवाय तक्रारदाराने सासऱ्यावर सुद्धा गंभीर आरोप केला आहे. सासऱ्यांनी मला धमकावण्यासाठी घरी माणसं पाठवली होती असा त्याने आरोप केला आहे.

पत्नीमुळे मला खूप मानसिक यातना सहन कराव्या लागल्या असा आरोप या व्यक्तीने केला आहे. पत्नी माझ्या आर्थिक स्थितीची खिल्ली उडवायची. तिच्या लाईफस्टाइलचा खर्च उचलण्याची ऐपत नसल्याने सतत काहीतरी बोलायची. ती तिचा वेळा तिच्या श्रीमंत मित्र-मैत्रिणींसोबत घालवायची. सतत पार्टी, ड्रिकिंग हे तिच्या लाइफस्टाइलचा भाग बनलेलं. मला खूप मानसिक कुंचबणा सहन करावी लागली असे आरोप या पीडित पतीने केले आहेत. पत्नीने माझा लैंगिक छळ केला, माझ्याशी क्रूर मानसिकतेने वागली असे पीडित पतीचे आरोप आहेत. सतत माझा लैंगिक छळ करायची, अश्लील व्हिडिओ पाठवून त्यात जसं दाखवतात तसं करायला लावायची. पूर्व प्रियकरांसोबत तिचे अनैतिक संबंध असल्याची पत्नीने स्वत:च आपल्याकडे कबुली दिली होती, असा दावा पीडित पतीने केला आहे.

फक्त युनिफॉर्म आणि लॅपटॉप घेऊन जाऊ दिला

ही बाब मी दोन्ही बाजूंच्या पालकांच्या निदर्शनास आणून दिली. कुटुंबाने 4 जुलै 2024 रोजी मध्यस्थी सुद्धा केली. 24 सप्टेंबर 2024 रोजी तिने मला घरातून बाहेर काढलं. तिची आई तिला चेन्नईला घेऊन गेली. त्यांनी मला रहात्या घरातून फक्त माझा युनिफॉर्म आणि लॅपटॉप घेऊन जाण्याची परवानगी दिली. 1.87 लाख रुपयांची कॅश, सोनं आणि चांदीचे दागिने, 35 ग्रॅमची सोन्याची चेन, 18 ग्रॅमच ब्रेसलेट आणि 11 ग्रॅमची अंगठी, कागदपत्र पासपोर्ट, शैक्षणिक प्रमाणपत्र आणि अनेक घरगुती वस्तू या घरातच आहेत. त्यांनी त्या बेकायदरित्या आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत असा दावा पीडित पतीने केला आहे.

Follow Us