AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : PUBG खेळताना सूत जुळलं, लग्नाच्या आणाभाका घेतल्या, त्यानंतर त्याने तिला आयुष्यातूनच उठवलं; काय झालं तिच्यासोबत?

लग्नाचे वचन देऊन त्या व्यक्तीने आपल्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.

Mumbai Crime : PUBG खेळताना सूत जुळलं, लग्नाच्या आणाभाका घेतल्या, त्यानंतर त्याने तिला आयुष्यातूनच उठवलं; काय झालं तिच्यासोबत?
क्षुल्लक कारणातून हॉटेलमध्ये गोळीबार
| Updated on: Jul 24, 2023 | 1:46 PM
Share

मुंबई | 24जुलै 2023 : व्हर्च्युअल जगात झालेली ओळख ही तितकीच आभासी असते. त्यावर फारसं विसंबून राहण्यात अर्थ नाही. ऑनलाइन गेमच्या माध्यमातून ओळख झालेल्या एका व्यक्तीने आपल्यावर वारंवार अत्याचार (abused) केल्याचा आरोप करत ३३ वर्षीय महिलेने पोलिसांत धाव घेतली आहे. पबजी गेम (PUBG game) खेळता खेळता आरोपीशी ओळख झाल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितलं.

पंत नगर पोलिसांत दिलेल्या निवेदनानुसार, 2020 च्या पीडित महिलेची आरोपीशी ओळख झाली. पबजी गेम खेळता खेळता त्यांचा एकमेकांशी संवाद वाढला. शेवटी तिचा सामना त्या माणसाशी झाला आणि तेव्हापासून ते गेम खेळत असताना एकमेकांशी संवाद साधत होते. तिने ज्याच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे, त्या व्यक्तीने लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. आरोपी इसमाने आपल्याला लग्नाचे आश्वासन देत झुलवले आणि तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप पीडितेने केला आहे.

गुप्तपणे रेकॉर्ड केला तो व्हिडीओ

सिंधील सूर्यवंशी असे आरोपीचे नाव असून त्याने अनेक वर्षांपासून पीडितेच्या विश्वासाचा गैरफायदा घेत तिच्याशी लग्न करण्याचे वारंवार आश्वासने दिली. या संपूर्ण कालावधीत, तो पीडितेला वेगवेगळी हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला, तेथेही तिला खोटी आश्वासने देत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. एवढेच नव्हे तर एकदा त्याने तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केला आणि समंतीशिवाय गुप्तपणे तिचा व्हिडीओही रेकॉर्ड केल्याचा आरोपही पीडितेने लावला आहे. त्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने पीडितेला शरीरसंबंध ठेवण्यासही भाग पाडले, असे पीडितेने तिच्या तक्रारीत नमूद केले.

अखेर काही दिवसांनी आरोपीने त्याचे वचन पाळण्यास आणि पीडित महिलेशी लग्न करण्यास थेट नकार दिला, ज्यामुळे ती उध्वस्त झाली.

आरोपी झाला फरार

या घटनेमुळे हादरलेल्या पीडित महिलेने शुक्रवारी पोलिस स्थानक गाठत त्यांना आपबीती कथन केली. त्यानंतर तिने आरोपीविरोधात तक्रारही दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता तो फरार झाल्याचे ध्यानात आले. पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांनी आरोपीविरोधात ३७६ , ३७६ आणि ४२० या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.