निर्घृण खुनाने नाशिक हादरले; चाकूचे 25 वार करून महिलेचा घेतला जीव

| Updated on: Nov 04, 2021 | 10:56 AM

स्वच्छ, सुंदर आणि शांत शहर म्हणून ओळख असणारे नाशिक गेल्या काही दिवसांपासून खुनाच्या घटनांनी हादरले आहे.

निर्घृण खुनाने नाशिक हादरले; चाकूचे 25 वार करून महिलेचा घेतला जीव
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

नाशिकः स्वच्छ, सुंदर आणि शांत शहर म्हणून ओळख असणारे नाशिक गेल्या काही दिवसांपासून खुनाच्या घटनांनी हादरले आहे. आता एका महिलेचा चाकूचे 25 वार करून जीव घेतल्याचे समोर येत आहे. पूजा आंबेकर असे मृताचे नाव असून, याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकमधील आंनदवल्ली खून प्रकरणाचा नुकताच उलगडा झाला. याप्रकरणी तब्बल 20 जणांना तुरुंगाची हवा खावी लागतेय. त्यात बिल्डरांपासून ते दोन कुख्यात गुंडांचाही समावेश आहे. त्यानंतर झालेल्या परप्रांतीय कामगाराचा झालेला खून. याप्रकरणीही पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. आता त्याच नाशिकमधल्या कबीरनगरमध्ये आणखी एका महिलेचा अतिशय निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली आहे. पूजा आंबेकर असे मृत महिलेचे नाव आहे. पूजावर तिच्यासोबत राहणाऱ्या इसमाने एकदोन नव्हे, तर चक्क जवळपास 25 चाकूचे वार केले आहेत. रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचा अंदाज आहे. संशयित संतोष आंबेकर फरार असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. विशेष म्हणजे आंबेकरवर पूर्वीही दोन खुनाचे गुन्हे दाखल आहेत. तो अट्टल गुन्हेगार असल्याचे समजते.

मजुराचा गळा चिरला

नाशिकच्या पंचवटीमध्ये अवघ्या 20 रुपयांसाठी मजुराचा गळा चिरून खून केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. संशयित आरोपी पंडित गायकवाड उर्फ लंगड्या याने बिडी पिण्यासाठी फिरस्ता असलेल्या मजुराकडे 20 रुपये मागितले. त्याने पैसे न दिल्याचा राग आल्याने आरोपीने त्याच्या गळ्यावर वार करुन खून केला. मारेकऱ्याने तरुणाचा गळा चिरला. तेव्हा त्याच्या रक्ताचे डाग चक्क अर्ध्या किलोमीटरपर्यंत पडले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेतला. तेव्हा त्यात पंपावर एक व्यक्ती हात धुत असल्याचे दिसले. त्या व्यक्तीची चौकशी करून पोलिस आरोपीपर्यंत पोहचले.

पत्नीच्या प्रियकराला जाळले

पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून पतीने विवाहितेच्या प्रियकराचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. त्यानंतर मृतदेह हातभट्टीमध्ये टाकून जाळण्यात आला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ‘दृश्यम’ चित्रपटाशी साधर्म्य असलेली परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न आरोपीने केला. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीतील बावधन येथे हा प्रकार घडला. मात्र, हिंजवडी पोलिसांनी या हत्येचा उलगडा करत तिघा जणांना अटक केली आहे, तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे. पती लंकेश रजपुत उर्फ लंक्या, गोल्या ऊर्फ अरूण रजपुत, सचिन तानाजी रजपुत यांना पोलिसांनी अटक केली आहे. एका अल्पवयीन मुलाला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Woman brutally murdered in Nashik,Search for absconding accused)

इतर बातम्याः

दिवाळीच्या मुहूर्तावर मोठा दिलासा; गोडतेल लिटरमागे 7 रुपयांनी स्वस्त

दिवाळीनंतर नाशिकमध्ये पाडापाडी; सोमवारपासून अतिक्रमणांवर महापालिकेचे बुलडोझर!

महापालिका निवडणुकीत नाशिकमध्ये 43 प्रभाग 3 सदस्यीय, तर 1 असेल चौघांचा!