AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हनिमूनला गेले पण…काहीच न घडल्यानं पत्नी थेट कोर्टात; अजब मागणीवर काय निर्णय आला?

महिलेने एक अजब दावा करून थेट घटस्फोटाची मागणी केली आहे. या मागणीवर न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. घटस्फोटाची मागणी करत या महिलेने तिच्या नवऱ्याकडे पोटगी म्हणून तब्बल 90 लाख रुपयांची मागणी केली होती. विशेष म्हणजे न्यायालयाने पोटगीची ही मागणी फेटाळून लावली असून थेट पतीच्या बाजूने निकाल दिला आहे. या महिलीने माझा पती लैंगिकदृष्ट्या सक्रिय नसल्याचा दावा केला होता.

हनिमूनला गेले पण...काहीच न घडल्यानं पत्नी थेट कोर्टात; अजब मागणीवर काय निर्णय आला?
crime news (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)
| Updated on: Aug 21, 2025 | 8:26 PM
Share

Crime News : आजकाल घटस्फोटाचे प्रमाण फारच वाढले आहे. छोट्या-मोठ्या कारणामुळे नवरा-बायको आता थेट न्यायालयाकडे विभक्त होण्याची मागणी करताना दिसत आहेत. सध्या मात्र महिलेने एक अजब दावा करून थेट घटस्फोटाची मागणी केली आहे. या मागणीवर न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. घटस्फोटाची मागणी करत या महिलेने तिच्या नवऱ्याकडे पोटगी म्हणून तब्बल 90 लाख रुपयांची मागणी केली होती. विशेष म्हणजे न्यायालयाने पोटगीची ही मागणी फेटाळून लावली असून थेट पतीच्या बाजूने निकाल दिला आहे. या महिलीने माझा पती लैंगिकदृष्ट्या सक्रिय नसल्याचा दावा केला होता.

90 लाखांच्या पोटगीची मागणी फेटाळून लावली

तेलंगणातील उच्च न्यायालयाने महिलेच्या या मागणीवर निकाल दिला आहे. या महिलेने आपल्या पतीवर नपुंसक असल्याचा आरोप केला होता. मात्र आरोप करणारी महिला तिचा पती नपुंसक असल्याचा दावा सिद्ध करून शकणारे ठोस पुरावे सादर करू न शकल्याचे सांगत त्या महिलेची 90 लाखांच्या पोटगीची मागणी फेटाळून लावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला आणि आरोपी पुरुष यांच्यात 2013 साली लग्न झालं होतं. हैदरबादमध्ये त्यांचा विवाहसोहळा संपन्न झाला होता.

डॉक्टरांनी सांगितले पतीवर उपचार होऊ शकत नाहीत

माझ्या पतीने तो नपुंसक असल्याचे माझ्यापासून लपवले होते. लग्न झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासून माझा नवरा शरीरसंबंध ठेवण्यास असमर्थ होता. आम्ही मधुचंद्रासाठी केरळ तसेच काश्मीरमध्ये गेलो होतो. तिथेही हीच समस्या होती, असा आरोप महिलेने केला होता. 2015 साली ती नवऱ्यासोबत अमेरिकेत गेली होती. तिथे डॉक्टरांनी माझ्या नवऱ्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तुमच्या पतीवर कोणतेही उपचार होऊ शकत नाहीत, असे डॉक्टरांनी सांगितले होते, असेही या महिलेने न्यायालयात सांगितले आहे. दरम्यान, या सर्व बाबी समोर आल्यानंतर माझे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण झाले. तसेच नवा संसार सुरू करण्याचे माझे स्वप्न धुळीस मिसळले, अशी खंतही तिने न्यायालयापुढे मांडली होती.

पतीने काय दावा केला?

तर दुसरीकडे आमचा प्रेमविवाह आहे. भारत आणि अमेरिका अशा दोन्ही देशांत माझे वैवाहिक जीवन चांगले होते. सुरुवातीला आम्हाला अडचण आली. पण उपचार केल्यानंतर माझी लैंगिक समस्य दूर झाली. या काळात मी पत्नीला आर्थिक मदत केली. मी पत्नीच्या बँक खात्यावर 28 लाख रुपये पाठवले होते. माझ्या पत्नीने पैशांच्या लालसेतून हा आरोप केला आहे, असा दावा तक्रारदार महिलेच्या पतीने काला.

न्यायालयाने काय निर्णय दिला?

दरम्यान, दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. संबंधित आरोपी पतीच्या इम्पोटन्सी टेस्टमध्ये काहीही ठोस निकाल आलेला नाही. तसेच पतीचा स्पर्म काऊंटही बरोबर आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. तसेच पती शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ होता तर मग पीडित महिलेने लग्नाच्या पाच वर्षांनंतर घटस्फोटासाठी अर्ज का केला? लवकर अर्ज का केला नाही? अशी शंका उपस्थित करत महिलेची 90 लाखांच्या पोटगीची मागणी फेटाळून लावली.

Follow Us
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा