
प्रेमात माणसं काहीहीह करू शकतात, जीव देऊ शकतात आणि एखाद्याचा जीव घेऊ शकतात. अशा अनेक घटना गेल्या काही काळात उघडकीस आल्या असतानाच आता मुरादाबादच्या बिलारी पोलीस स्टेशन परिसरातील अलेहदादपूर देवा नागला गावातही धक्कादायक प्रकार घडला आहे. त्या गावात वीरपाल नावाच्या शेतकऱ्याची हत्या करण्यात आली. पोलिसांनी कसून तपास केला असता आणखीच भयानक सत्य समोर आलं. मृताची पत्नी सुनीता हिचने तिचा प्रियकर अंशु सोबत मिळून तिच्या पतीची हत्या करण्याचा कट रचला होता. पोलिसांनी दोघांनाही अटक करून संपूर्ण कट उघड केला. आरोपी महिलेला पाच मुले आहेत आणि ती तिच्या प्रियकरापेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे.
चौकशीदरम्यान, सुनीताने गुन्हा कबूल केला. तिने सांगितलं की ती आणि प्रियकर अंशूची शेजारी-शेजारी शेती आहे. सुमारे चार महिन्यांपूर्वी, अंशूने भात लागवडीच्या हंगामात तिच्या शेताला भेट दिली होती आणि त्यांच्यात जवळीक निर्माण झाली आणि त्यांचं प्रेम जडलं. सुनीताने सांगितलं, की ती तिचा नवरा वीरपालला दारू पाजल्यानंतर शेतावर पाठवत असे आणि त्याच वेळी ती तिचा प्रियकर अंशुला घरी बोलावत असे.
दोघांना एकत्र पाहिलं अन्…
काही दिवसांपूर्वी, वीरपालने घरी दोघांनाही को त्या स्थितीत पाहिले. त्याने सुनीताला रागाच्या भरात मारहाण केली. त्यानंतर सुनीताने अंशुला सांगितले की जर तिने तिच्या पतीला मार्गातून हटवलं नाही तर ती विष पिऊन आत्महत्या करेल. मग त्यांनी त्याला मारण्याचा कट रचला.
शेतात आखला भयानक कट
2 ऑक्टोबर रोजी, भात मळणी करताना, वीरपालने अंशु आणि सुनीता यांना एकत्र पाहिले आणि त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर, दोघांनी वीरपालला संपवण्याचा निर्णय घेतला. 13 ऑक्टोबरच्या रात्री वीरपाल रात्री शेतात गेला होता, तेव्हा सुनीताच्या इशाऱ्यावरून अंशुही त्याच्यामागोमाग गेला आणि त्याने गळा दाबून वीरपालचा खून केला.
आरोपी अंशूने पोलिसांना सांगितले की, भात लावणी करताना त्याची सुनिताशी भेट झाली आणि त्यानंतर एकमेकांवर प्रेम जडलं. सुनीताने त्याला सांगितलं की “तू अजून लग्न केलेले नाहीस. मी आयुष्यभर तुझ्यासोबत राहीन, पण त्याआधी माझ्या नवऱ्याचा मार्गातून काटा काढला पाहिजे तरच आपल्याला सोबत राहता येईल.” तिच्या या अटीमुळेच अंशूने वीरपालची हत्या केली.
पोलिसांनी दोघांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि स्थानिक साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे हा गुन्हा उघडकीस आणला. चौकशीदरम्यान दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी सुनीता आणि अंशु यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात पाठवलंय. मृत वीरपालची पाच लहान मुले आता त्यांच्या वृद्ध आजीसोबत रहात आहेत.