सोलापुरात चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशांची लूट, यशवंतपूर-अहमदाबाद ट्रेनमधून 50 पेक्षा जास्त तोळे सोनं लंपास

सोलापुरात चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशांची लूट करण्यात आल्याची घटना घडली आहे (Yesvantpur-Ahmedabad Train Robbery).

सोलापुरात चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशांची लूट, यशवंतपूर-अहमदाबाद ट्रेनमधून 50 पेक्षा जास्त तोळे सोनं लंपास
Solapur Train Robbery
| Updated on: Mar 01, 2021 | 10:38 AM

सोलापूर : सोलापुरात चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशांची लूट करण्यात आल्याची घटना घडली आहे (Yesvantpur-Ahmedabad Train Robbery). यशवंतपूर-अहमदाबाद या ट्रेनमध्ये प्रवाशांची लूट झाली आहे. अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी-दुधनी येथे ही घटना घडली आहे (Yesvantpur-Ahmedabad Train Robbery).

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (1 मार्च) पहाटे साडेचार वाजता अज्ञात लुटारुंनी सिग्नल कट केल्याची प्राथमिक माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गाडी तब्बल एक तासभर जागेवरच थांबली. यादरम्यान या चोरट्यांनी गाडीतील प्रवाशांना लुटलं.

या घटनेत या चोरट्यांनी प्रवाशांच्या पन्नासहून अधिक तोळे सोन्यावर डल्ला मारला आहे. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी, लोहमार्ग पोलीस, आरपीएफचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून चोरट्यांचा तपास सुरु केला आहे.

Yesvantpur-Ahmedabad Train Robbery

संबंधित बातम्या :

कोल्हापूर पोलिसांची धडक कारवाई, 19 लाखांचा गुटखा पकडला

अमरावतीत एका रात्रीत 5 दुकानं फोडली, अवघ्या काही तासात अल्पवयीन आरोपी ताब्यात