अमरावतीत एका रात्रीत 5 दुकानं फोडली, अवघ्या काही तासात अल्पवयीन आरोपी ताब्यात

अमरावतीत एका रात्रीत 5 दुकानं फोडली, अवघ्या काही तासात अल्पवयीन आरोपी ताब्यात
Amravati Robbery

पोलिसांनी अवघ्या काही तासातच अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं आहे (Amravati 5 Shops Robbed In One Night).

Nupur Chilkulwar

|

Feb 27, 2021 | 2:19 PM

अमरावती : अमरावती जिल्ह्यात कोरोना सारख्या आजाराने व्यापारीवर्ग आधीच हवालदिल (Amravati 5 Shops Robbed In One Night) झालेला आहे. अशाही परिस्थितीत परिसरात चोरीच्या घटना काही थांबताना दिसत नाहीये. असंच काहीसं पुन्हा एकदा घडलं आहे. अमरावतीच्या चांदूर रेल्वेमध्ये एका रात्रीत पाच दुकानं फोडण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासातच अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं आहे (Amravati 5 Shops Robbed In One Night).

94 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

चांदूर रेल्वे शहरात एकाच रात्रीत चार दुकानात आणि तालुक्यातील मांजरखेड (कसबा) येथे एका पानठेल्यात चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली. चांदूर रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवित अवघ्या काही तासातच अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून पूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याच्याकडून तब्बल 94 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

16 वर्षीय अल्पवयीन आरोपी काही तासात ताब्यात

चांदूर रेल्वे पोलिसांनी यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव येथील एका 16 वर्षीय अल्पवयीन आरोपीला मांजरखेड येथील शिवारातून ताब्यात घेतले. त्याच्याजवळून चोरी केलेले सहा मोबाईल आणि सात मोबाईल बॅटरी किंमत अंदाजे 90 हजार रुपये, 2 हजार रुपयांचा माल आणि अंदाजे 2 हजार रुपये रोख आणि चोरी करण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे.

अवघ्या काही तासांतच आरोपीला ताब्यात घेऊन मुद्देमात हस्तगत करण्याची कौतुकास्पद कामगिरी चांदूर रेल्वे पोलिसांनी ठाणेदार मगन मेहते यांच्या नेतृत्वात केली आहे. यानंतर एसडीपीओ जितेंद्र जाधव यांनी पोलीस स्टेशनला भेट दिली आणि चोरीची संपूर्ण माहिती जाणून घेतली.

Amravati 5 Shops Robbed In One Night

संबंधित बातम्या :

इचलकरंजीत डॉक्टरवर प्राणघातक हल्ला, गाडीची तोडफोड, परिसरात तणावाचं वातावरण

अंबानींच्या घराबाहेर सापडलेली कार चोरीची; विक्रोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून झाली चोरी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें