इचलकरंजीत डॉक्टरवर प्राणघातक हल्ला, गाडीची तोडफोड, परिसरात तणावाचं वातावरण

इचलकरंजीत डॉक्टरवर प्राणघातक हल्ला, गाडीची तोडफोड, परिसरात तणावाचं वातावरण
Attack on doctor

इचलकरंजी शहराजवळील कबनूर गावामध्ये एका डॉक्टरवर प्राणघातक (Attack On Doctor At Ichalkaranji) हल्ला करुन त्याच्या गाडीची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Nupur Chilkulwar

|

Feb 27, 2021 | 7:31 AM

इचलकरंजी : इचलकरंजी शहराजवळील कबनूर गावामध्ये एका डॉक्टरवर प्राणघातक (Attack On Doctor At Ichalkaranji) हल्ला करुन त्याच्या गाडीची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काही अज्ञातांनी या डॉक्टरवर हल्ला केला आहे. हल्ल्यात डॉक्टर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत (Attack On Doctor At Ichalkaranji).

कबनूर-रुई ओढ्यालगत 3 अनोळखी व्यक्तींनी या डॉक्टरवर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. विवेक सदाशिव बने (वय 35) असे हल्ला झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे.

मिळालेली माहिती अशी, विवेक यांचे चंदूर येथे रुग्णालय आहे. ते रात्री काम आटपून चार चाकी गाडीने घरी येत होते. यादरम्यान, चंदूर-रुई ओढ्यालगत काही 3 अनोळखी व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले.

त्यानंतर त्यांना तातडीने आय.जी.एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, त्याच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिवाजी पोलीस दाखल होऊन डॉक्टरांना रुग्णालयात दाखल केले आहे. यावेळी रुग्णालयावर शहरातील डॉक्टरांनी मोठी गर्दी केली. शहरामध्ये वाढत्या मारामारी, खून यासारखे प्रकार वाढल्याने शहरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Attack On Doctor At Ichalkaranji

संबंधित बातम्या :

बेल वाजवण्याच्या दोरीने बसमध्येच गळफास, कंडक्टरच्या आत्महत्येने मराठवाड्यात खळबळ

त्या संशयास्पद गाडीचे मालक मुंबई क्राईम ब्रांचमध्ये हजर, पोलिसांकडून चौकशी सुरु

रत्नागिरीतील उच्चभ्रू वस्तीतील सेक्स रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश, दोघांना अटक

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें