रत्नागिरीतील उच्चभ्रू वस्तीतील सेक्स रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश, दोघांना अटक

रत्नागिरीतील उच्चभ्रू वस्तीतील सेक्स रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश, दोघांना अटक
Ratnagiri sex Racket

रत्नागिरी पोलिसांनी उच्चभ्रू वस्तीमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय (Ratnagiri Sex Racket Busted By Police).

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Jul 12, 2021 | 10:47 AM

रत्नागिरी : रत्नागिरी पोलिसांनी उच्चभ्रू वस्तीमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय (Ratnagiri Sex Racket Busted By Police). रत्नागिरीतील ओसवाल नगर येथे भाड्याच्या बंगल्यात हे सेक्स रॅकेट सुरु होते. रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केलीय (Ratnagiri Sex Racket Busted By Police).

स्थानिक गुन्हे शाखेला या रॅकेट संदर्भातील टीप मिळाली होती. त्यानुसार, गुरुवारी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेनं सापळा रचला. यासाठी बनावट गिऱ्हाईक तयार करण्यात आले. या बनावट गिऱ्हाईकाच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क करण्यात आला.

त्यानंतर पोलिसांनी ओसवाल नगर येथील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. यावेळी एका पीडित तरुणीची पोलिसांनी सुटका केली. या प्रकरणी हे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका महिलेसह दोघांना पोलिसांनी अटक केलीय. यांच्याकडून काही मोबाईल, रोख रक्कम देखील जप्त केली गेलीय.

ओसवाल नगर येथील बंद बंगल्यात हे सेक्स रॅकेट सुरु होते. शहरातील रिकामे बंगले हेरुन ते भाड्याने घेवून त्या ठिकाणी हे सेक्स रॅकेट सुरु होते. यात शहरातील काही एजंट म्हणून काम करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, या प्रकरणात आता पोलीस मुळापर्यंत जाणार का हा प्रश्न आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा ,पोलीस उपनिरीक्षक विनायक नरवणे, रेखा जाधव, कर्मचारी सुभाष भागणे, अमोल भोसले, बाळू पालकर, मिलींद कदम, अरुण चाळके ,राकेश बागुल , सत्यजित दरेकर, नितीन डोमने, प्रवीण खांबे, वैष्णवी यादव, दत्ता कांबळे, संजय जाधव यांनी ही कामगिरी केली.

Ratnagiri Sex Racket Busted By Police

संबंधित बातम्या :

मुलीला भूतबाधा झाल्याचा बनाव, वेळेवर उपचार न मिळाल्याने मुलीचा मृत्यू, दोन भोंदू बाबांना साताऱ्यात अटक

आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियाला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; कोर्टाकडून 2 मार्चपर्यंत कोठडी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें