Chandrapur Crime: लग्नावरून वाद होताच प्रियकराचं टाळकं भडकलं, जे व्हायला नको तेच घडलं; त्या थरारक घटनेने चंद्रपूर हादरले

Chandrapur Crime: लग्नावरून वाद होताच प्रियकराचं टाळकं भडकलं, जे व्हायला नको तेच घडलं; त्या थरारक घटनेने चंद्रपूर हादरले
लग्नावरून वाद होताच प्रियकराचं टाळकं भडकलं, जे व्हायला नकोत तेच घडलं; त्या थरारक घटनेने चंद्रपूर हादरले
Image Credit source: tv9 marathi

Chandrapur Crime: प्रियकराचे नाव अजय कांबळे असं आहे. अजय आणि त्याची प्रेयसी हे दोघेही गडचांदूर येथील रहिवासी आहेत. चंद्रपूरच्यी जिवती तालुक्यातील माणिकगड किल्ल्यावर काल दुपारी हे दोघेही फिरायला गेले होते.

निलेश डाहाट

| Edited By: भीमराव गवळी

May 25, 2022 | 8:54 AM

चंद्रपूर: चंद्रपुरात (chandrapur) अत्यंत थरारक घटना घडली आहे. लग्नावरून वाद झाल्याने संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीवर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने प्रेयसीवर चाकू हल्ला केला. त्यानंतर स्वत:ही हाताची नस कापून घेतली. त्यामुळे दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांना तात्काळ रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले आहे. चाकूचा वार मुलीच्या मानेवर लागल्याने ती सुरक्षित असून दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल दुपारी ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोघांचीही कसून चौकशी केली जात आहे. या घटनेमागे आणखी काही अँगल आहेत का? याचा तपास पोलीस करत आहेत. शिवाय लग्नाच्या (marriage) मुद्द्यावरूनच दोघांची भांडणं झाली की भांडणाचं आणखी काही कारण आहे याचाही पोलीस तपास करत आहेत. मात्र, सध्या या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.

प्रियकराचे नाव अजय कांबळे असं आहे. अजय आणि त्याची प्रेयसी हे दोघेही गडचांदूर येथील रहिवासी आहेत. चंद्रपूरच्यी जिवती तालुक्यातील माणिकगड किल्ल्यावर काल दुपारी हे दोघेही फिरायला गेले होते. यावेळी गप्पा मारत असताना त्यांच्यात लग्नाचा विषय निघाला. त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. या संतापाच्या भरात अजयने चाकू काढला आणि प्रेयसीवर चाकूने सपासप वार केले. सुदैवाने या मुलीच्या मानेवर चाकूचे वार बसले. चाकूचे हलके वार बसल्याने ही मुलगी सुरक्षित आहे. प्रेयसीवर हल्ला केल्यानंतर त्यानेही स्वत:च्या हाताच्या नसा कापून घेतल्या.

आरडाओरडा झाल्याने बचावले

अचानक प्रियकराने चाकू हल्ला केल्यामुळे ही मुलगी भयभीत झाली. तिने जोरजोरात आरडाओरड सुरू केली. तेवढ्यात अजने हाताच्या नसा कापल्याने रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या. त्यामुळे त्याची प्रेयसी अधिकच घाबरली. तिने आणखीनच जोरजोरात आरडाओरड केली. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी धावत येऊन त्यांना मदत केली. या दोघांनाही तातडीने गडचांदूर येथील प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तिथून त्यांना चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोघांवरही उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

अजय हा 21 वर्षाचा असून त्याची प्रेयसी 20 वर्षाची आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तसेच अजय कांबळेवर 307 कलमाखाली हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच 309 कलमाखाली आत्महत्येचा प्रयत्न केल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. हत्येमागचं नेमकं कारण शोधलं जात आहे. लग्नाचा वाद हेच हल्ल्यामागचं कारण आहे की आणखी काही कारण आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र, या घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें