Pune ATS : जुनैद मोहम्मदला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी; घातपाती कारवायांच्या संशयावरून पुण्यातल्या दापोडीतून एटीएसनं केलीय अटक

Pune ATS : जुनैद मोहम्मदला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी; घातपाती कारवायांच्या संशयावरून पुण्यातल्या दापोडीतून एटीएसनं केलीय अटक
संजय तेलनाडेला खंडणीप्रकरणी पोलीस कोठडी
Image Credit source: tv9

फेसबुकच्या माध्यमातून जुनैद हा लष्कर-ए-तोयबाचा संपर्कात आला होता. शस्त्र खरेदी करण्यासाठी फंडिंग गोळा करण्याचे काम तो करत होता. राज्यातील काही भागांत त्याने रेकीही केली होती.

प्रदीप गरड

|

May 24, 2022 | 4:03 PM

पुणे : जुनैद मोहम्मद या तरुणास 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दहशतवादविरोधी पथकाकडून (Anti Terrorism Squad) त्याला अटक करण्यात आली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. काश्मीरमधील अतिरेकी संघटनेकडून फंडिंग झाल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याला पुणे न्यायालयात (Pune court) दुपारी हजर केले. हा तरूण काश्मीरमधील गझवाते-अल-हिंद या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता. त्याची माहिती मिळाल्यावर पुणे दहशतवादविरोधी पथकाकडून या तरूणाला अटक करण्यात आली होती. पुणे एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, गझवाते अल हिंद या काश्मीरमधील अतिरेकी संघटनेने (Terrorist organization) महिनाभरापूर्वीच या तरुणाच्या बँक खात्यात दहा हजार रुपये जमा केले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो या संघटनेच्या संपर्कात आला होता.

जम्मू काश्मीरला घेऊन जाणार

दहशतवादविरोधी पथक तपासासाठी जुनैदला जम्मू काश्मीरला घेऊन जाणार आहे. मदरश्यामध्ये जुनैदला ट्रेनिंग देण्यात आले, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र सध्या तपास सुरू असल्याने मदरशाचे नाव अद्याप समोर आलेले नाही. फेसबुकच्या माध्यमातून जुनैद हा लष्कर-ए-तोयबाचा संपर्कात आला होता. शस्त्र खरेदी करण्यासाठी फंडिंग गोळा करण्याचे काम तो करत होता. राज्यातील काही भागांत त्याने रेकीही केली होती.

हे सुद्धा वाचा

कोण आहे जुनैद मोहम्मद?

जुनैद हा मुळचा बुलडाणा जिल्ह्यातील खामगावचा रहिवासी असून तो मागील दीड वर्षांपासून पुण्यात राहत होता. त्याचे शिक्षण मदरशात झाले आहे. अटक केलेला आरोपी जुनैद मोहम्मद हा अवघा 18 वर्षांचा असून तो बेरोजगार असल्याचे समोर येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो जम्मू काश्मीरमधील दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला होता. त्यानंतर राज्यात घातपाती कारवायांसाठी काश्मीरमधीलच एका संघटनेने त्याला महिनाभरापूर्वी 10 हजार रुपये पाठवले होते. त्याच्या बँक खात्यात हे पैसे टाकण्यात आले होते. काही दिवसांपासून एटीएस आरोपीच्या मागावर होते.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें