AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune ATS : काश्मीरमधल्या अतिरेकी संघटनांकडून फंडिंग? पुण्याच्या दापोडीतून एटीएसनं केली तरुणाला अटक

राज्यात घातपाती कृत्यांसाठी काश्मीरमधील अतिरेकी संघटनेकडून या तरुणाला पैसे पुरवण्यात आले, असा आरोप त्याच्यावर आहे. तरुणाला पैसे नेमके का पाठवण्यात आले? तो या पैशांचे काय करणार होता? हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, दहशतवादी कृत्यांसाठीच हे फंडिंग करण्यात आल्याचा एटीएसचा आरोप आहे.

Pune ATS : काश्मीरमधल्या अतिरेकी संघटनांकडून फंडिंग? पुण्याच्या दापोडीतून एटीएसनं केली तरुणाला अटक
एटीएस (संग्रहित छायाचित्र)Image Credit source: newsonair
| Edited By: Pradeep Garad | Updated on: May 24, 2022 | 12:52 PM
Share

पुणे : दहशतवादविरोधी पथकाकडून (Anti Terrorism Squad) जुनेद मोहम्मद या तरुणाला दापोडी परिसरातून अटक करण्यात आली आहे. काश्मीरमधील अतिरेकी संघटनेकडून फंडिंग झाल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याला पुणे न्यायालयात (Pune court) दुपारी हजर केले जाणार आहे. त्यावेळी अधिक तपासासाठी दहशतवादविरोधी पथक म्हणजेच एटीएस त्याची कोठडी मागण्याची शक्यता आहे. हा तरूण काश्मीरमधील गझवाते-अल-हिंद तसेच लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. पुणे दहशतवादविरोधी पथकाकडून या तरुणाला आता अटक करण्यात आली आहे. पुणे एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, गझवाते अल हिंद या काश्मीरमधील अतिरेकी संघटनेने (Terrorist organization) महिनाभरापूर्वीच या तरुणाच्या बँक खात्यात दहा हजार रुपये जमा केले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो या संघटनेच्या संपर्कात आला होता.

आरोपीची कोठडी मागणार एटीएस?

राज्यात घातपाती कृत्यांसाठी काश्मीरमधील अतिरेकी संघटनेकडून या तरुणाला पैसे पुरवण्यात आले, असा आरोप त्याच्यावर आहे. तरुणाला पैसे नेमके का पाठवण्यात आले? तो या पैशांचे काय करणार होता? हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, दहशतवादी कृत्यांसाठीच हे फंडिंग करण्यात आल्याचा एटीएसचा आरोप आहे. आरोपीला पुणे न्यायालयात दुपारी हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी एटीएसकडून त्याची कोठडी मागण्यात येणार आहे. जुनैद हा मुळचा बुलडाणा जिल्ह्यातील खामगावचा रहिवासी असून तो मागील दीड वर्षांपासून पुण्यात राहत होता. त्याचे शिक्षण मदरशात झाले आहे.

आरोपीचे वय केवळ 18 वर्षे

अटक केलेला आरोपी जुनेद मोहम्मद हा अवघा 18 वर्षांचा असून तो बेरोजगार असल्याचे समोर येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो जम्मू काश्मीरमधील दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला होता. त्यानंतर राज्यात घातपाती कारवायांसाठी काश्मीरमधीलच एका संघटनेने त्याला महिनाभरापूर्वी 10 हजार रुपये पाठवले होते. त्याच्या बँक खात्यात हे पैसे टाकण्यात आले होते. काही दिवसांपासून एटीएस आरोपीच्या मागावर होते. अखेर त्याच्या आज मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार