सुमित वाघमारे हत्या : प्रेम, लग्न, हत्या आणि अटक… संपूर्ण घटनाक्रम

प्रेमासारखी दुसरी सुंदर गोष्ट जगात नाही, असे आपण कायम ऐकत आलेलो असतो. याच सुंदर गोष्टीमुळे कुणाचा जीव जातो, अन् तेही अत्यंत निर्घृणपणे जीव जातो, तेव्हा मात्र काळजाचा थरकाप उडतो. पुढारलेल्या विचारांचा समजल्या जाणाऱ्या किंवा म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात सात दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेने तर अवघं राज्य हळहळलं. प्रेमातून लग्न करुन सुखाने नांदू लागलेल्या नवविवाहित जोडप्याचं अवघं संसार […]

सुमित वाघमारे हत्या : प्रेम, लग्न, हत्या आणि अटक... संपूर्ण घटनाक्रम
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:47 PM

प्रेमासारखी दुसरी सुंदर गोष्ट जगात नाही, असे आपण कायम ऐकत आलेलो असतो. याच सुंदर गोष्टीमुळे कुणाचा जीव जातो, अन् तेही अत्यंत निर्घृणपणे जीव जातो, तेव्हा मात्र काळजाचा थरकाप उडतो. पुढारलेल्या विचारांचा समजल्या जाणाऱ्या किंवा म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात सात दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेने तर अवघं राज्य हळहळलं. प्रेमातून लग्न करुन सुखाने नांदू लागलेल्या नवविवाहित जोडप्याचं अवघं संसार उद्ध्वस्त झालं. भावांनी मिळूनच बहिणीचा संसार मातीमोल करुन टाकला.

भाग्यश्री लांडगे आणि सुमित वाघमारे असे या दुर्दैवी जोडप्याचं नाव. आज सुमित या जगात नाही. त्याची हत्या झालीय. त्याची ‘चूक’ केवळ एकच, ती म्हणजे त्याने भाग्यश्रीवर प्रेम केलं आणि त्यातून लग्न केलं. दोघेही आनंदात राहू लागले होते. मात्र, अखेर त्यांच्या सुखी संसाराला नजर लागलीच. आणि होत्याचं नव्हतं झालं.

बीडमधील आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालयात सुमित आणि भाग्यश्री शिकत होते. इथेच त्यांच्यात ओळख झाली, त्यातून घट्ट मैत्री झाली आणि त्यातून लग्नही झालं. सुमित अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा मुलगा होता. माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे एक रुम भाड्याने घेऊन दोघेही राहत होते. भाग्यश्रीच्या घरी श्रीमंती, तर सुमितच्या घरची स्थिती हालाखीची होती. दोघांच्या संमतीने सारं काही घडत होतं.

सुमित आणि भाग्यश्री आपापल्या आवडीने जोडीदार मिळाल्याच्या आनंदात जगत होते. मात्र, गरीब घरातल्या मुलाशी प्रेम करुन लग्न केल्याचा राग भाग्यश्रीच्या भावांच्या मनात पेटत होता. आणि त्यांनी बहिणीच्या सुखी संसाराची कोणतीही पर्वा न करता तिच्या नवऱ्याला म्हणजेच सुमित वाघमारेला संपवण्याचा कट रचला.

18 डिसेंबर 2018 रोजी आदित्य महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या परीक्षा सुरु होत्या. सुमित आणि त्याची पत्नी भाग्यश्री परीक्षा देऊन महाविद्यालयाच्या बाहेर आले. महाविद्यालयातून बाहेर 100-150 पावलांवर आल्यानंतर भाग्यश्रीच्या भावांनी सुमितवार धारदार शस्त्रांनी वार केले आणि भररस्त्यात तडफडत ठेवून पसार झाले.

भाग्यश्रीच्या भावांनी सुमितवर हल्ला केल्यानंतर सुमित रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यावेळी भाग्यश्री मोठ्या आकांतेने ‘माझ्या पतीला वाचावा वाचवा’ म्हणून आक्रोश करत होती. गयावया करत होती. जवळपास 12 मिनिटे तिचा हा आकांत नि आक्रोश सुरु होता. कुणाही संवेदनशील माणसाचं काळीज चिरुन जावं, असा हा आकांत होता. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या एकाचेही काळीज पाझरले नाही. इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या संवेदना मेलेल्या होत्या. याउलट निर्लज्जपणे डोळ्यांनी पाहत ती घटना मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत होते. शेवटी एक रिक्षाचालक पुढे आला आणि सुमितला रिक्षात टाकून बीडच्या जिल्हा रुग्णालयात नेण्याचं धाडस केलं. मात्र रस्त्यातच सुमितची प्राणज्योत मालवली.

इथे एक आणखी धक्कादाय गोष्ट घडली, ती म्हणजे, ज्या आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बाहेरच हे हत्याकांड घडलं, त्या महाविद्यालयाच्या वॉचमनने महाविद्यालयाचे गेट बंद करुन घेतला. तो गेट सुरु असता, तर कदाचित सुमित तिकडून पळून आपला जीव वाचवू शकला असता. मात्र, सुमितवर काळाने घाला घातलाच.

घटना घडून चार दिवस उलटल्यानंतरही पोलिसांनी कुणालाच पकडले नव्हेत. मुख्य आरोपीसह इतर जणही पसार झाले होते. सुमितचे नातेवाईक पोलिस ठाण्यातच ठाण मांडून बसले. सुमितच्या मारेकऱ्यांना पकडत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. मात्र, वरिष्ठ पोलिसांनी समजावल्यांतर नातेवाईकांनी थोडं नमतं घेतलं. मात्र, पोलिसांना सुमितचे मारेकरी काही सापडत नव्हते. फोन कॉल, लोकेशन ट्रेस, 26 जणांच्या चौकशा पोलिसांनीही जंग जगं पछाडले. मात्र, मारेकऱ्यांबाबत काहीच धागेदोरे सापडत नव्हते.

अखेर सुमितच्या हत्येचा कट रचणारा पहिला मारेकरी सापडला तो सहा दिवसांनी म्हणजेच 24 डिसेंबर 2018 रोजी. कृष्णा क्षीरसागर हा आरोपी पहिल्यांदा पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर सातव्या दिवशी म्हणजे 25 डिसेंबर 2015 रोजी सुमितचा मुख्य मारेकरी बालाजी लांडगे पोलिसांच्या हाती लागला. सोबत संकेत वाघ आणि गजानन क्षीरसागरही पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

बालाजी लांडगे हा भाग्यश्रीचा सख्खा भाऊ. या निर्दयी आणि क्रूर बालाजीनेच सुमितला जीवानिशी संपवलं. बालाजीला साथ दिली ती संकेत वाघ या त्याच्या मित्राने आणि कृष्णा व गजानन या आतेभावांनी. म्हणजे भाग्यश्रीच्या सख्ख्या भावने आणि दोन आतेभावांनीची सुमितला संपवलं. बहिणीचा संसार उद्ध्वस्त करणारे हे क्रूर भाऊ म्हणजे नात्याला कलंक आहेत.

सुमित वाघमारेचे चारही मारेकरी सध्या बीड पोलिसांच्या ताब्यात आहेत. या चौघांनाही फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी मोठ्या आकांताने भाग्यश्री सुद्धा करतेय आणि सुमितचे नातेवाईक सुद्धा करत आहेत. आज ना उद्या मारेकऱ्यांना कायद्याने शिक्षा होईलच, मात्र गरीब मुलाशी प्रेमविवाह केल्याने आपला स्वाभिमान दुखावला गेला आणि त्यातून सुमितची हत्या करण्यात आली, याला सामाजिक कारणंही आहेत. माणूस म्हणून आपण एका पातळीवर कुणाला पाहत नसल्याचे हे द्योतक आहे.

पाहा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.