अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी 28 दिवसांसाठी जेलबाहेर

नागपूर : अंडवर्ल्ड डॉन अरुण गवळी जेलबाहेर आला आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहातून काल अरुण गवळीची फर्लोवर सुटका झाली आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीला 28 दिवसांची फर्लो रजा मंजूर केली होती. कुटुंबाल भेटण्यासाठी फर्लोची रजा द्यावी, अशा मागणीचा अर्ज कुख्यात गुंड अरुण गवळीने केला होता. या अर्जाला सकारात्मक प्रतिसाद देत, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने […]

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी 28 दिवसांसाठी जेलबाहेर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:47 PM

नागपूर : अंडवर्ल्ड डॉन अरुण गवळी जेलबाहेर आला आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहातून काल अरुण गवळीची फर्लोवर सुटका झाली आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीला 28 दिवसांची फर्लो रजा मंजूर केली होती.

कुटुंबाल भेटण्यासाठी फर्लोची रजा द्यावी, अशा मागणीचा अर्ज कुख्यात गुंड अरुण गवळीने केला होता. या अर्जाला सकारात्मक प्रतिसाद देत, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीला फर्लो रजा मंजूर केली होती. त्यानंतर काल अरुण गवळी जेलबाहेर आला.

अरुण गवळी सध्या शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. अरुण गवळीने एकेकाळी मुंबईमध्ये आपली दहशत निर्माण केली होती. कुख्यात गुंड आणि अंडरवर्ल्ड डॉन म्हणून अरुण गवळीची गुन्हेगारी विश्वात ओळख आहे.

काय आहे कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरण?

कमलाकर जामसांडेकर यांचा सदाशिव सुरवे नावाच्या व्यक्तीशी संपत्तीवरुन वाद होता. त्यानंतर सदाशिवने अरुण गवळीच्या गँगमधील 2 व्यक्तींना जामसांडेकर यांची हत्या करण्यास सांगितले. दोघांनी सदाशिवची अरुण गवळीशी भेट घालून दिली. गवळीने हे करण्यासाठी 30 लाखांची सुपारी मागितली. सदाशिवने होकार दिल्यावर गवळीने आपल्यावर संशय येऊ नये म्हणून प्रताप गोडसेला जामसांडेकर हत्येसाठी नवे शूटर शोधण्यास सांगितले. गोडसेने नवे शूटर शोधण्याचे काम श्रीकृष्ण गुरव या दुसऱ्या साथीदाराकडे दिले. श्रीकृष्णने नरेंद्र गिरी आणि विजयकुमार गिरी यांची निवड केली. तसेच त्यांना प्रत्येकी अडीच लाख रुपये देण्याचे कबूल केले. यापैकी त्यांनी प्रत्येकी 20 हजार रुपये अॅडव्हान्सही दिला.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, विजय कुमार गिरीने अशोक कुमार जायसवार या सहकाऱ्यासह जवळजवळ 15 दिवस कमलाकर जामसांडेकरवर लक्ष ठेवले. त्यानंतर 2 मार्च 2007 ला जामसांडेकर यांची त्यांच्या राहत्या घरी हत्या केली. गवळीला या घटनेनंतर 1 वर्षांनी पकडण्यात आले. तत्कालीन गुन्हे शाखेचे प्रमुख राकेश मारिया, अतिरिक्त पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस निरिक्षक दिनेश कदम, धनंजय दौंड, नीनाध सावंत, योगेश चव्हाण यांच्या पथकाने अरुण गवळीला अटक केली होती.

संबंधित बातमी :

गँगस्टर अरुण गवळीच्या पक्षाचा महायुतीला पाठिंबा

मोदींवर टीका झाल्यावर वाईट वाटतं, अरुण गवळीच्या पत्नीकडून मोदींची स्तुती

निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी दगडी चाळीत परतणार

Non Stop LIVE Update
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.