गँगस्टर अरुण गवळीच्या पक्षाचा महायुतीला पाठिंबा

मुंबई : लोकसभा निवडणुका आता शेवटच्या टप्प्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या 29 एप्रिलला होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यातच दक्षिण मुंबईच्या राजकारणात आता गँगस्टर अरुण गवळीच्या पक्षाचं नाव जोडलं गेल्याने तिथल्या निवडणुकीची रंगत वाढली आहे. अरुण गवळीच्या ‘अखिल भारतीय सेना’ या पक्षाने दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात महायुतीला जाहीर …

गँगस्टर अरुण गवळीच्या पक्षाचा महायुतीला पाठिंबा

मुंबई : लोकसभा निवडणुका आता शेवटच्या टप्प्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या 29 एप्रिलला होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यातच दक्षिण मुंबईच्या राजकारणात आता गँगस्टर अरुण गवळीच्या पक्षाचं नाव जोडलं गेल्याने तिथल्या निवडणुकीची रंगत वाढली आहे. अरुण गवळीच्या ‘अखिल भारतीय सेना’ या पक्षाने दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात महायुतीला जाहीर पाठिंबा दिला आहे.

दक्षिण मुंबईचे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांना अखिल भारतीय सेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. यासंदर्भात अरुण गवळी यांच्या पत्नी आशा गवळी, मुलगी गीता गवळी आणि विजय अहीर यांच्याशी काहीच वेळापूर्वी महायुतीचे कोकण समन्वयक आमदार प्रसाद लाड, शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर आणि बीएमसी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. यावेळी गीता गवळी यांनी त्यांचा पक्ष हा महायुतीला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं.

गँगस्टर अरुण गवळीने 1997 साली ‘अखिल भारतीय सेना’ या पक्षाची स्थापना केली. अरुण गवळीने त्याच्या पक्षाच्या वतीने 2004 सालची लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबईत त्याने जवळपास 26 टक्के मतं मिळवली होती. पण त्या निवडणुकीत गवळीचा पराभव झाला. त्याच वर्षी विधानसभा निवडणुकीसाठी अखिल भारतीय सेनेच्या 20 उमेदवारांनी निवडणूक लढवली, पण अरुण गवळी वगळता एकही उमेदवार निवडून आला नाही. अरुण गवळी सध्या शिवसेना नगरसेवकाच्या हत्येप्रकरणी तुरुंगवास भोगत आहे. ऑगस्ट 2012 मध्ये त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली होती. अरुण गवळी तुरुंगात गेल्यानंतरही त्याच्या पत्नीकडून पक्षबांधणी सुरु आहे.

दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विरुद्ध मिलिंद देवरा

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते आणि विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि उमेदवार मिलिंद देवरा यांच्यात लढत होत आहे. मनसेने आधीच मिलिंद देवरा यांना समर्थन दिल्याने अरविंद सावंत यांच्या अडचणीत वाढ झाली होती. मात्र, आता गवळीचा पक्ष महायुतीला पाठिंबा देणार असल्याने ही लढत अधिक रंगतदार होणार आहे.

लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात दक्षिण मुंबईसोबतच महाराष्ट्रातील एकूण 17 लोकसभेच्या जागांसाठी येत्या 29 एप्रिलला मतदान होणार आहे. तर 23 मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *