300 हुन अधिक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित, या शाळेत घडला धक्कादायक प्रकार, पालक आक्रमक, तो वाद..

| Updated on: Jan 16, 2024 | 2:02 PM

एका शाळेमध्ये धक्कादायक आणि हैराण करणारा प्रकार घडला आहे. हेच नाही तर शाळा प्रशासनाच्या चुकीमुळे विद्यार्थी हे परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. हेच नाही तर आता शाळा प्रशासनावर अत्यंत गंभीर आरोप हे पालकांकडून केले जात आहेत. पोलिस देखील शाळेत पोहचले आहेत.

300 हुन अधिक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित, या शाळेत घडला धक्कादायक प्रकार, पालक आक्रमक, तो वाद..
Follow us on

मुंबई : ठाण्यातील एका शाळेमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि हैराण करणारा प्रकार घडलाय. ठाण्यातील वर्तक नगर भागातील लिटिल फ्लावर या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दरम्यान शाळा प्रशासनाकडून परीक्षेच्या वेळेस बाहेर काढण्यात आले. शाळेची फीस न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेमधून उठवून बाहेर काढण्यात आले. यानंतर पालक हे चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळतंय. फक्त पालकच नाही तर राजकिय पक्षांचे पुढारी देखील आक्रमक झाले आहेत. आता शाळा प्रशासनाला चांगलेच धारेवर धरल्याचे देखील बघायला मिळतंय. पालकांनी ठिय्या मांडत शाळेचा निषेध देखील नोंदवलाय.

आता या प्रकरणात पालकांकडून अनेक आरोप हे केले जात आहेत. काहींनी आगाऊ फिस भरून देखील विद्यार्थ्यांना परीक्षेत बसून दिले नाही. मॅनेजमेंटच्या चुकीमुळे पालक चांगलेच नाराज झाल्याचे बघायला मिळत आहेत. फक्त हेच नाही तर घटनास्थळी वर्तकनगर पोलिस देखील दाखल झाले आहेत. पालकांना शांत राहण्याचे आव्हान पोलिसांकडून केले जातंय.

शाळेची महिन्याची फि भरली नाही म्हणून आणि काही पालकांनी ऑनलाईन फिस भरुन सुद्धा विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न दिल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. त्यामुळे पालक चांगलेच आक्रमक झालेत. पालकांनी शाळा प्रशासनाकडून सुरु असलेल्या पिळवणूकीविरोधात संताप व्यक्त करत शाळा प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलेय.

आम्ही दर महिना फिस भरतो पण कधी तरी उशीर होतो, त्यातही शाळा प्रशासनाकडुन दंड आकारला जातो. ऑनलाईन फिस भरलेली शाळेला मान्य नाही, शाळेत जर विद्यार्थी मराठीत बोलले तरी 50 रुपये दंड घेतला जातो. मुलींनी शाळेत टिकली लावली तरी 50 रुपये दंड आकारण्यात येतो. तसेच विद्यार्थ्यांना फिस भरण्यास उशीर झाला तर तुमची या शाळेत शिकण्याची लायकी नाही तुम्ही मराठी शाळेत शिका अशी भाषा शाळेच्या शिक्षकांकडून आणि मुख्याध्यापकांकडून वापरली जाते.

अत्यंत गंभीर आरोप पालकांकडून शाळा प्रशासनावर लावले जात आहेत. तर या सर्व प्रकारावर शाळा प्रशासनाने बोलण्यास नकार दिला आहे. युवा सेना सचिव पूर्वेश सरनाईक लिटिल फ्लावर शाळेत दाखल झाले. शाळा प्रशासन बरोबर बैठक देखील त्यांनी घेतलीये. राष्ट्रवादी शरद पवार गट ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई शाळेत दाखल झाले.

मनसे युवा सेना देखील शाळा प्रशासनाला जाब विचारत आहे. लिटित प्लावर शाळेच्या प्रशासनावर राजकीय पक्ष आक्रमक झाल्याचे सध्या बघायला मिळतंय. 300 हुन आधील विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहले आहेत. लिटिल फ्लावर शाळेवर कारवाई करण्याची मागणी केली जातंय. शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि मुख्यमंत्री यांच्या कानावर शाळेचा विषय कानी टाकणार असल्याचे नेत्यांकडून सांगितले जातंय.