All India Bar Examination (AIBE): ऑल इंडिया बार एक्झामिनेशनच्या रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ, allindiabarexamination com वर करा अर्ज

| Updated on: Mar 22, 2021 | 5:10 PM

ऑल इंडिया बार एक्झामिनेशनच्या रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ देण्यात आलीये. नव्या मुदतवाढीनुसार 31 मार्चपर्यंत उमेदवारांना रजिस्ट्रेशन करता येईल. (all india bar examination)

All India Bar Examination (AIBE): ऑल इंडिया बार एक्झामिनेशनच्या रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ, allindiabarexamination com वर करा अर्ज
सांकेतिक फोेटो
Follow us on

All India Bar Examination (AIBE) : ऑल इंडिया बार एक्झामिनेशनच्या रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ देण्यात आलीये. नव्या मुदतवाढीनुसार 31 मार्चपर्यंत उमेदवारांना रजिस्ट्रेशन करता येईल. इच्छुक उमेदवार 31 मार्चपर्यंत allindiabarexamination.com या ऑफिशियल वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन (AIBE Exam Registration) करु शकतील. 31 मार्च 2021 पर्यंत रजिस्ट्रेशन केलेल्या उमेदवारांना 2 एप्रिल 2021 पर्यंत रजिस्ट्रेशन फी भरता येईल. बार काऊन्सिल ऑफ इंडियातर्फे (BCI) या परीक्षेचे आयोजन केले जाईल.

बार काऊन्सिल ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार येणाऱ्या 25 एप्रिलला ऑल इंडिया बार एक्झामिनेशन आयोजित केली जाईल. त्यासाठी 10 एप्रिलपर्यंत अ‌ॅडमिटकार्ड (All India Bar Examination Admit Card) मिळतील. त्यापूर्वी बीसीएने काही महत्त्वाच्या सूचना उमेदवारांना दिल्या आहेत. “या परीक्षेदरम्यान काही अपरिहार्य परिस्थिती निर्माण झाली तर, परीक्षेची तारीख वाढवली जाऊ शकते. तसेच परीक्षेच्या तारखेत किंवा इतर बदल झाले, तर उमेदवारांची फी परत केली जाणार नाही, असे बार काऊन्सीलने स्पष्ट केलेले आहे.

ऑल इंडिया बार एक्झामिनेशन काय आहे?

ऑल इंडिया बार एक्झामिनेशन (AIBE) ही एक कायदेविषयक परीक्षा असून ती राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. भारतात कायद्याचा अभ्यास केल्यानंतर प्रॅक्टीस करण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. लॉची पदवी असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. यासोबत लॉच्या अंतिम वर्षात असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा ही परीक्षा देता येते. राष्ट्रीय पातळीवर ही परीक्षा आयोजित केली जाते. या अगोदर ऑल इंडिया बार एक्झामिनेशन XV (AIBE-XV) चे आयोजन 24 जनेवारी 2021 रोजी केले होते.देशातील 52 शहरांत ही परीक्षा झाली होती.

अर्ज कसा कराल?

>>>  ऑल इंडिया बार परीक्षा देण्यासाठी (All India Bar Exam) allindiabarexamination.com या वेबसाईटवर जा

>>>  होमपेजवर आल्यानंतर Registration (AIBE-XVI) वर क्लिक करा.

>>>  मोबाईल नंबर आणि ईमेल आईडीच्या मदतीने रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा

>>>  रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज (AIBE Application Form) भरावा.

इतर बातम्या :

RRB Group D Exam : हा आहे ग्रुप डी परीक्षेचा पॅटर्न आणि अभ्यासक्रम, जाणून घ्या प्रत्येक तपशील