डी एड, बीएड पूर्ण भरतीच नाही, 67 हजार पदे रिक्त; भावी शिक्षकांचा जीव टांगणीला

| Updated on: Mar 16, 2024 | 11:42 AM

सरकारी नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. डी एड आणि बीएडचे भरती प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून राज्यात पूर्ण झाली नाहीये. यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. अनेक डी एड आणि बीएड धारक हे बेरोजगार दिसत आहेत. 67 हजार पदे रिक्त असल्याचे देखील सांगितले जाते.

डी एड, बीएड पूर्ण भरतीच नाही, 67 हजार पदे रिक्त; भावी शिक्षकांचा जीव टांगणीला
Follow us on

मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात शिक्षण भरती झाली नाही. काही दिवसांपूर्वी शासनाकडून शिक्षण भरती जाहिर केली. मात्र, सहा ते सात वर्षांपासून उमेदवार हे या भरती प्रक्रियेच्या प्रतिक्षेत आहेत. राज्यात 67 हजार रिक्त पदे आहेत. अनेक शाळांमध्ये शिक्षक नसल्याने परिस्थिती नक्कीच गंभीर आहे. डी एड आणि बी एड पूर्ण करुन उमेदवारांना वाट पाहावी लागत आहे. अनिवार्य असलेली अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेतली गेली. त्यामध्ये 2 लाख 16 हजार 443 उमेदवार उत्तीर्ण झाली. हेच नाही तर गुणवत्ता यादी देखील जाहीर करण्यात आली.

केवळ 11 हजार जागा भरण्यात आल्या. या गुणवत्तांना न्याय म्हणून नाही तर राज्यातील जिल्हा परिषदेच्या हजारो शाळा शिक्षकांविना होत्या. 25 टक्के पदांची प्रक्रिया सुरू केली. 50 हजार शिक्षकांची भरती होणार असे आव्हान देखील सरकारकडून करण्यात आले होते. सतत शिक्षक भरती होत नसल्याने बेरोजगारांची संख्या वाढत आहे.

राज्यातील विद्यार्थी शिक्षकांविना असल्याचे देखील बघायला मिळतंय. 6 आक्टोंबर 2023 आणि 23 जानेवारी 2024 खाजगीकरण विरोधी हजारो गुणवत्ता पुर्ण बेरोजगारांनी मोर्चे काढले. परिणामी राज्यसरकारने माघार घेत खाजगीकरणाचा जीआर मागे घेतला. राज्यातल्या प्रत्येक सर्व परीक्षा उत्तीर्ण असलेला बेरोजगार तरुण शालेय शिक्षण विभागाच्या घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे देखील काही परीक्षार्थिनी म्हटले.

शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या व खाजगी शिक्षण संस्थांसाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या उमेदवारांची शेवटी आता प्रतिक्षा संपल्याचे दिसले. मात्र, उमेदवारांची संख्या जास्त आणि जागा अत्यंत कमी भरल्या जात आहेत.

https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx या साईटवर तुम्हाला भरतीची माहिती मिळेल. पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2022 या संकेतस्थळावर शिक्षक भरतीची सर्व माहिती ही आपल्याला मिळेल. राज्यात सध्या डी एड आणि बी एड धारकांची संख्या अधिक आहे आणि त्या तुलनेत जागा अत्यंत कमी प्रमाणात भरल्या जात असल्याने नक्कीच उमेदवारांमध्ये संताप हा बघायला मिळतोय.