AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धारावीतील विद्यार्थ्यांना टॅबचं वितरण, शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये: आदित्य ठाकरे

विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क अबाधित राखण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षण पद्धती गरजेची झाली असल्याचे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

धारावीतील विद्यार्थ्यांना टॅबचं वितरण, शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये: आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरेंच्या हस्ते टॅबचं वाटप
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Aug 18, 2021 | 6:09 PM
Share

मुंबई: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाहीत.  विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क अबाधित राखण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षण पद्धती गरजेची झाली असल्याचे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. याच जाणिवेतून ऑनलाईन शिक्षण पद्धतीत कोणीही वंचित राहू नये यासाठी धारावी काळा किल्ला मनपा शाळेतील 500 विद्यार्थ्यांना आज आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शैक्षणिक टॅब चे वितरण करण्यात आले.

टॅब वितरण कार्यकर्माला खासदार राहुल शेवाळे, नगरसेवक वसंत नकाशे, महापालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर, शिक्षणाधिकारी राजू तडवी, आयएएचव्ही च्या प्रमुख मीरा गुप्ता जी उपस्थित होत्या.मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन व्हॅल्यूज (आयएएचव्ही) संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला.

विद्यार्थ्यांचं कौतुक

आदित्य ठाकरे म्हणाले, कोविडची परिस्थिती किती दिवस चालेल माहीत नाही. पण, त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होता कामा नये. यापूर्वी शाळेत शिकण्यासाठी टॅब दिले होते, परंतु आता ऑनलाइन शिक्षणासाठी टॅब देण्यात येत आहेत. हा बदल लक्षात घेता विद्यार्थ्यांसाठी नवनवीन शिक्षण पद्धतीचा अवलंब गरजेचा झाला असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व विद्यार्थ्यांनी मास्क व्यवस्थित लावले होते, त्यांच्या या जाणिवेचे आदित्य ठाकरे यांनी आवर्जून कौतुक केले.

मुंबई विद्यापीठाकडून पहिली गुणवत्ता यादी जाहीर

मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेज, मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशांसाठीची प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर केली आहे. मुंबई विद्यापीठात अनुदानित असो की विना अनुदानित, विद्यार्थ्यांना प्रवेश पूर्व नोंदणी बंधनकारक आहे. ही प्रवेश पूर्व नोंदणी प्रक्रिया 5 ऑगस्टपासून सुरु झाली असून ती 14 ऑगस्टपर्यंत सुरु होती. पदवी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता 25 ऑगस्ट तर तिसरी 30 ऑगस्टला जाहीर केली जाईल.

गुणवत्ता यादी कुठे पाहायची?

मुंबई विद्यापीठाकडून आज पदवी प्रवेशांची पहिली गुणवत्ता यादी विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाहीर केली गेली आहे. mu.ac.in या वेबसाईटवर विद्यार्थी त्यांनी निवडलेल्या महाविद्यालयाची गुणवत्ता यादी पाहू शकतात.

गुणवत्ता यादी कशी पाहायची?

स्टेप 1: गुणवत्ता यादी पाहण्यासाठी, सर्वप्रथम mu.ac.in वर MU च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. स्टेप 2: वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या मुंबई विद्यापीठ प्रवेश 2021 लिंकवर क्लिक करा. स्टेप 3: लॉगिन डिटेल्सद्वारे सबमिटवर क्लिक करा. स्टेप 4: सबमिट केल्यानंतर तुमची पहिली गुणवत्ता यादी स्क्रीनवर दिसेल.

इतर बातम्या:

पवार साहेब, तुम्ही कधी तरी खरं बोलणार आहात का? ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सदाभाऊ खोतांचा खोचक सवाल

पेट्रोलची डबल सेंच्युरी करण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा आहे का?; नाना पटोलेंनी घेतली फिरकी

BMC School at Dharavi Tab Distribution function Aaditya Thackeray everyone will get online education

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ