CBSE Practical Exam:परीक्षकांची माहिती अपडेट करा, अन्यथा 50 हजारांचा दंड भरा, सीबीएसईचा प्राचार्यांना इशारा

| Updated on: Apr 07, 2021 | 12:32 PM

सीबीएसईनं दहावी आणि बारावीच्या प्रात्याक्षिक परीक्षांसाठी परीक्षकांची यादी अपडेट करण्याचे निर्देश शाळांना दिले आहेत.

CBSE Practical Exam:परीक्षकांची माहिती अपडेट करा, अन्यथा 50 हजारांचा दंड भरा, सीबीएसईचा प्राचार्यांना इशारा
सीबीएसई दहावीचा निकाल लवकरच जाहीर होणार, येथे जाणून घ्या नवीन अपडेट
Follow us on

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या दहावी आणि बारावीच्या प्रात्याक्षिक परीक्षांसाठी परीक्षकांची यादी अपडेट करण्याचे निर्देश शाळांना दिले आहेत. कोविड-19 च्या संकटकाळात परीक्षकांची माहिती अद्यावत असावी, यासाठी सीबीएसईनं प्राचार्यांना परीक्षकांची माहिती भरण्याचे निर्देश दिले आहेत. सीबीएसईच्या ऑनलाईन अफिलिएटेड स्कूल इन्फोर्मेश सिस्टीम या पोर्टलवर 10 एप्रिलपूर्वी माहिती भरण्याचे आदेश दिले आहेत. ज्या शाळांकडून माहिती भरली जाणार नाही त्यांना 50 हजारांचा दंड ठोठावला जाणार आहे. (CBSE board issued circular to schools to update examiner list till 10 April or pay fine )

10 एप्रिलपर्यंत लिंक सुरु राहणार

सीबीएसईकडून oasis वर परीक्षकांची माहिती भरण्याची लिंक 10 एप्रिलपर्यंत सुरु ठेवली जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 12 वीच्या प्रात्याक्षिक परीक्षांमध्ये परीक्षकांची कमतरता दिसून आल्यानं सीबीएसईनं हा निर्णय घेतला आहे. सीबीएसईनं 3 एप्रिलला काढलेल्या परीपत्रकानुसार 10 एप्रिलपूर्वी त्यांच्या शाळेतील पात्र परिक्षकांची माहिती अपलोड करावी लागणार आहे.

तर प्राचार्यांना 50 हजारांचा दंड

सीबीएसईनं 3 एप्रिलला जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार ज्या शाळांची माहिती 10 एप्रिलपर्यंत भरली जाणार नाही. त्या शाळांच्या प्राचार्यांना 50 हजार रुपयांचा वैयक्तिक दंड सुनावला जाणार आहे. हा दंड भरण्यापासून वाचण्यासाठी 10 एप्रिलपूर्वी शिक्षकांची माहिती भरावी लागणार आहे.

सीबीएसईचा प्राचार्यांना इशारा

ज्या शाळेतील परीक्षकांची माहिती पोर्टलवर भरली जाणार नाही त्यांच्या प्राचार्यांना 50 हजार रुपयांचा दंड केला जाईल. सीबीएसई अशा शाळांचा निकाल जाहीर करणार नाही. सीबीएसईकडून नियुक्त न केलेल्या परीक्षकांनी प्रात्याक्षिक परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द केली जाईल. सीबीएसई अशा विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेईल.

प्रॅक्टिकल परीक्षेत दिलासा

सीबीएसईने घोषित केले आहे की कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे प्रॅक्टिकल परीक्षेत भाग घेऊ न शकलेल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना 11 जूनपूर्वी आणखी एक संधी मिळणार आहे. कोविड-19 संक्रमित उमेदवारांसाठी योग्य वेळी सीबीएसई प्रॅक्टिकल परीक्षा पुन्हा आयोजित करण्यास सीबीएसईने शाळांना सांगितले आहे. सीबीएसई परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज म्हणाले, ‘कोविड संक्रमित झाल्यामुळे किंवा कुटुंबाच्या एखाद्या सदस्याच्या संसर्गामुळे एखादा उमेदवार प्रॅक्टिकल परीक्षेत गैरहजर राहिल्यास, 11 जूनपर्यंत शालेय प्रादेशिक अधिकार्‍यांशी सल्लामसलत करून योग्य वेळेत अशा उमेदवारांसाठी प्रॅक्टिकल परीक्षा आयोजित करण्यात येईल.

संबंधित बातम्या:

Maharashtra ssc hsc Exam : पहिली ते आठवी सरसकट पास, नववी ते बारावीच्या परीक्षेबाबत काय निर्णय?

हातात एअरगन, वॉकी-टॉकी, मुंबईला फुकट जायचं म्हणून ट्रव्हल्सवाल्यांशी हुज्जत, वर्दीतल्या खोट्या आयपीएसचा पर्दाफाश

(CBSE board issued circular to schools to update examiner list till 10 April or pay fine )