CBSE Board : नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात दिलासा नाही, जाणून घ्या संपूर्ण तपशील

या वर्षासाठी जाहीर केलेला नवीन अभ्यासक्रम सीबीएसईची अधिकृत वेबसाईट cbseacademic.nic.in वर जाऊन डाउनलोड केला जाऊ शकतो.  (Students from 9th to 12th are not relieved in the syllabus, check on cbseacademic.nic.in)

CBSE Board : नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात दिलासा नाही, जाणून घ्या संपूर्ण तपशील
सीबीएसई दहावीचा निकाल लवकरच जाहीर होणार, येथे जाणून घ्या नवीन अपडेट
Follow us
| Updated on: Apr 03, 2021 | 5:16 PM

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी नववी ते 12 वी पर्यंतच्या इयत्तांचा अभ्यासक्रम जाहीर केला आहे. यंदा अभ्यासक्रमात कोणतीही कपात न करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. कोविड-19 च्या संकटकाळात विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा भार कमी करण्यासाठी सीबीएसईने गेल्या वर्षी 2020-21 (CBSE Board 2021-22 New Syllabus) शैक्षणिक वर्षासाठी 9 वी ते 12 वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात 30 टक्के घट केली होती. ज्या विद्यार्थ्यांनी कमी अभ्यासक्रमाचा अभ्यास केला आहे ते मे-जूनमध्ये परीक्षेस बसतील. सीबीएसईने जारी केलेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार मागील शैक्षणिक वर्षात जो अभ्यास वगळण्यात आला होता, तो अभ्यासक्रम आगामी शैक्षणिक सत्र 2021-22 मध्ये अधिकृत अभ्यासक्रमात पुन्हा अॅड केला जाणार आहे. या वर्षासाठी जाहीर केलेला नवीन अभ्यासक्रम सीबीएसईची अधिकृत वेबसाईट cbseacademic.nic.in वर जाऊन डाउनलोड केला जाऊ शकतो.  (Students from 9th to 12th are not relieved in the syllabus, check on cbseacademic.nic.in)

प्रॅक्टिकल परीक्षेत दिलासा

सीबीएसईने घोषित केले आहे की कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे प्रॅक्टिकल परीक्षेत भाग घेऊ न शकलेल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना 11 जूनपूर्वी आणखी एक संधी मिळणार आहे. कोविड-19 संक्रमित उमेदवारांसाठी योग्य वेळी सीबीएसई प्रॅक्टिकल परीक्षा पुन्हा आयोजित करण्यास सीबीएसईने शाळांना सांगितले आहे. सीबीएसई परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज म्हणाले, ‘कोविड संक्रमित झाल्यामुळे किंवा कुटुंबाच्या एखाद्या सदस्याच्या संसर्गामुळे एखादा उमेदवार प्रॅक्टिकल परीक्षेत गैरहजर राहिल्यास, 11 जूनपर्यंत शालेय प्रादेशिक अधिकार्‍यांशी सल्लामसलत करून योग्य वेळेत अशा उमेदवारांसाठी प्रॅक्टिकल परीक्षा आयोजित करण्यात येईल.

परीत्रा केंद्र बदलण्याची मुभा

दोन्ही वर्गांची बोर्ड परीक्षा मे-जून आणि प्रायोगिक परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात येणार आहेत. नुकतीच सीबीएसईने दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्र बदलण्याचा पर्याय जारी केला होता. सीबीएसईने नोटीस बजावून परीक्षा केंद्र बदलण्याची घोषणा केली. यात सीबीएसईने म्हटले होते की कोरोना कालावधीत बरेच विद्यार्थी पालकांसह इतर शहरांमध्ये गेले आहेत. अशा परिस्थितीत ज्या विद्यार्थ्याला दहावी व बारावीच्या परीक्षेला हजेरी लावायची असेल त्यांना परीक्षा केंद्र बदलण्यासाठी पुरेशी शिथिलता मिळेल. (Students from 9th to 12th are not relieved in the syllabus, check on cbseacademic.nic.in)

इतर बातम्या

Maharashtra ssc hsc Exam : पहिली ते आठवी सरसकट पास, नववी ते बारावीच्या परीक्षेबाबत काय निर्णय?

हातात एअरगन, वॉकी-टॉकी, मुंबईला फुकट जायचं म्हणून ट्रव्हल्सवाल्यांशी हुज्जत, वर्दीतल्या खोट्या आयपीएसचा पर्दाफाश

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.