CBSE Board Result: दहावी, बारावीचा निकाल जाहीर, असा पाहा तुमचा निकाल
CBSE Board 12th Result 2024 Declared: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा सुमारे १८ लाख विद्यार्थ्यांनी बारावी बोर्डाची परीक्षा दिली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
CBSE Board 12th Result 2024 Declared: दहावी, बारावीची परीक्षा यंदा फेब्रुवारी-मार्च महिन्यात झाली होती. विद्यार्थी आता निकालाची वाट पाहत आहेत. सोमवारी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) दहावी, बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा सुमारे 18 लाख विद्यार्थ्यांनी बारावी बोर्डाची परीक्षा दिली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यंदा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 87.98 टक्के आहे. यंदा मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल 6.40 टक्के चांगला लागला आहे, असे मंडळाने जाहीर केले आहे.
सीबीएसई बोर्डने दहावीचा निकाल जाहीर केला. निकालाची टक्केवारी 93.60% राहिली. मागील वर्षापेक्षा ती 0.48 जास्त आहे. सन 2023 मध्ये निकाल 93.12% होता. 2024 मध्ये दहावी परीक्षेसाठी 2251812 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 2238827 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून 2095467 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल 2024:
- मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी- 91.52
- मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी- 85.12
- ट्रान्सजेंडरची उत्तीर्ण टक्केवारी – 50.00
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल असा तपासा
- CBSE बोर्डाचा results.cbse.nic.in किंवा cbse.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- मुख्यपृष्ठावर, ‘CBSE 12वी निकाल थेट लिंक’ वर क्लिक करा.
- लॉगिन पृष्ठ उघडेल, येथे तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.
- तुमचा CBSE बोर्ड निकाल स्क्रीनवर उघडेल, तो तपासा.
- विद्यार्थी येथून निकालाची डिजिटल प्रत डाउनलोड करू शकतील आणि ती त्यांच्याकडे ठेवू शकतील.
सात हजार केंद्रावर झाली परीक्षा
सीबीएसई बोर्डाची १२वीची परीक्षा देशभरातील 7 हजार 126 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. यावर्षी बारावीची परीक्षा 16 लाख 21 हजार 224 विद्यार्थ्यांनी दिली. त्यातील 14 लाख 26 हजार 420 विद्यार्थी 12वी उत्तीर्ण झाले. यंदा उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी ८७.९८ होती. गेल्या वर्षी (2023) एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 87.33 होती. म्हणजेच यंदाच्या निकालात 0.65 टक्क्यांनी वाढ झाली आहे.