रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, या प्रकारे तिकीट काढल्यास तीन टक्के बोनस, सुरु झाली सुविधा

general railway ticket online: यू.टी.एस. ऑन मोबाइल अ‍ॅप अ‍ॅड्रॉयड, आई.ओ.एस. आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टमवर मोफत डाऊनलोड करता येते. या अ‍ॅपमधून तिकीटाचे पेमेंट करण्यासाठी बॅकिंग किंवा व्हॅलेटचा वापर करता येतो. जनरल तिकीट काढण्यासाठी असणाऱ्या लांबच्या लांब रांगेत उभे राहण्यापेक्षा मोबाईलवर तिकीट काढणे आता सोपे झाले आहे.

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, या प्रकारे तिकीट काढल्यास तीन टक्के बोनस, सुरु झाली सुविधा
UTS Mobile Ticketing
Follow us
| Updated on: May 05, 2024 | 11:18 AM

भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या संख्येने आहे. रेल्वे प्रवाशांना विविध सुविधा देण्याचे प्रयत्न करत असते. ऑनलाईनच्या या युगात प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी लांबच्या लांब रांगेत उभे राहण्याची गरज राहिली नाही. रेल्वे आरक्षण तिकीट ज्याप्रमाणे आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरुन काढता येते, त्याचप्रमाणे साधारण तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट आणि मासिक पास घरी बसून काढता येणार आहे. यासाठी असणारी पाच किलोमीटरची अट रद्द करण्यात आली आहे. यूटीएस अ‍ॅपवरुन ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. तसेच या पद्धतीने तिकीट काढल्यास तीन टक्के बोनसही मिळणार आहे.

यू.टी.एस.अ‍ॅपवरुन सुविधा

रेल्वे मंत्रालयाने मोबाइल अ‍ॅप्लिकेशन यू.टी.एस.वरुन सुविधा दिली आहे. त्यासाठी प्ले स्टोरवरुन यू.टी.एस. (अनरिझव्हड तिकीट सिस्टम) डाऊनलोड करावे लागले. त्यानंतर त्याच्यावर लॉगीन केल्यावर तुम्हाला कधीही जनरल तिकीट, पास आणि प्लॅटफॉर्म तिकीट काढता येणार आहे. हे तिकीट काढण्यासाठी 3 टक्के बोनस देण्यात येणार आहे. त्यासाठी रांगेत थांबण्याची गरज नाही. सुट्या पैशांची कटकट राहणार नाही. वेळेची बचत होणार आहे. तसेच या अ‍ॅपमुळे पी.एन.आर. स्टेट्स, हॉटल बुकिंग, ट्रेनचे रनिंग स्टेट्स, सीट उपलब्धता, आलटरनेटिव्ह ट्रेन ही माहिती मिळणार आहे.

यापूर्वी हा होता नियम

यूटीएस अ‍ॅपसाठी यापूर्वी पाच किलोमीटरची मर्यादा होती. स्टेशनच्या परिसरात पाच किलोमीटरच्या आतच हे तिकीट काढता येत होते. आता ही मर्यादा रद्द करण्यात आली आहे. तुम्ही किती अंतरावर असल्यावर हे तिकीट काढू शकता. आरक्षण तिकीटासारखे घरी बसून जनरल तिकीट यूटीएसवर काढता येणार आहे.

हे सुद्धा वाचा

यू.टी.एस. ऑन मोबाइल अ‍ॅप अ‍ॅड्रॉयड, आई.ओ.एस. आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टमवर मोफत डाऊनलोड करता येते. या अ‍ॅपमधून तिकीटाचे पेमेंट करण्यासाठी बॅकिंग किंवा व्हॅलेटचा वापर करता येतो. जनरल तिकीट काढण्यासाठी असणाऱ्या लांबच्या लांब रांगेत उभे राहण्यापेक्षा मोबाईलवर तिकीट काढणे आता सोपे झाले आहे.

हे ही वाचा…

रेल्वेने प्रवास करताना ही चूक ठरली महागडी, बसला चार कोटींचा दंड

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.