CBSE Board Result 2024: दहावी, बारावीच्या निकालासाठी यंदा आणखी एक नवीन पद्धत

CBSE ssc and hsc Result 2024 changes: सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वी परीक्षेमध्ये यंदा सुमारे 39 लाख विद्यार्थी बसले होते. यापैकी 21 लाख 86 हजार 940 विद्यार्थ्यांनी हायस्कूल बोर्डाच्या (दहावी) परीक्षेसाठी तर 16 लाख 96 हजार 770 विद्यार्थ्यांनी इंटरमिजिएट बोर्डाच्या (बारावी) परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

CBSE Board Result 2024:  दहावी, बारावीच्या निकालासाठी यंदा आणखी एक नवीन पद्धत
result
Follow us
| Updated on: May 13, 2024 | 11:59 AM

दहावी, बारावीची परीक्षा यंदा फेब्रुवारी-मार्च महिन्यात झाली. विद्यार्थी आता निकालाची वाट पाहत आहेत. दहावी, बारावीच्या निकालासंदर्भात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) महत्वाची माहिती देण्यात आली आहे. या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाने निकालाची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. परंतु मे महिन्यात निकाल येण्याची शक्यता आहे.

मागील वर्षी सीबीएसई बोर्ड 10वी, 12वीचा निकाल मे महिन्यातच जाहीर केला होता. यंदा लोकसभा निवडणूक होत असल्याने दहावी आणि बारावीचे निकाल लवकरात लवकर जाहीर करावेत, असा दबाव मंडळावर आहे. यंदा निकालात सीबीएसई बोर्डाने एक महत्वाचा बदल केला आहे. हा निकाल बोर्डाची वेबसाइट cbse.gov.in वर जाहीर करण्यात येणार आहे. परंतु प्रथमच डिजिलॉकर अ‍ॅप आणि वेबसाइट digilocker.gov.in वर मिळणार आहे. त्यासाठी डिजिलॉकरवर खाते असणे गरजेचे आहे.

हे सुद्धा वाचा

असे बनवा डिजिलॉकरवर खाते

  • DigiLocker वर निकाल मिळण्यासाठी त्यावर खाते तयार करावे लागेल.
  • प्रथम DigiLocker च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल
  • त्यानंतर “Get Started with Account Confirmation” वर जावे लागेल.
  • तुमचा वर्ग (10वी किंवा 12वी) निवडा आणि त्यानंतर शाळेचा कोड, रोल नंबर आणि 6 अंकी प्रवेश कोड टाका.
  • आता मोबाईल नंबर, जन्मतारीख आणि OTP इत्यादी तपशील भरा.
  • निकाल जाहीर झाल्यानंतर, तुम्हाला तुमचा निकाल थेट या खात्यावर मिळेल.
  • तुमचे डिजिलॉकरवर खाते असेल तर तशी सूचना तुम्हाला खाते तयार करताना देईल. त्यामुळे पुन्हा खाते तयार करण्याची गरज नाही.
  • वेबसाईटप्रमाणे डिजिलॉकर अ‍ॅपवर या पद्धतीने खाते उघडता येईल. त्यासाठी गूगल प्ले स्टोर अ‍ॅप डाऊनलोड करुन घ्या.

39 लाख विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वी परीक्षेमध्ये यंदा सुमारे 39 लाख विद्यार्थी बसले होते. यापैकी 21 लाख 86 हजार 940 विद्यार्थ्यांनी हायस्कूल बोर्डाच्या (दहावी) परीक्षेसाठी तर 16 लाख 96 हजार 770 विद्यार्थ्यांनी इंटरमिजिएट बोर्डाच्या (बारावी) परीक्षेसाठी नोंदणी केली होती. हे सर्व विद्यार्थी आता निकाल लागण्याची वाट पाहत  आहेत.

Non Stop LIVE Update
महाविकास आघाडीच्या प्रेमातून नव्हे तर... राज ठाकरे यांनी दाखवला आरसा
महाविकास आघाडीच्या प्रेमातून नव्हे तर... राज ठाकरे यांनी दाखवला आरसा.
जरांगे पाटील यांचे 60-70 जागा विधानसभेला जिंकून येतील, कुणी केला दावा?
जरांगे पाटील यांचे 60-70 जागा विधानसभेला जिंकून येतील, कुणी केला दावा?.
अजून किती मुस्कटदाबी? रुपालीताई हीच निर्णयाची वेळ; अंधारेंची पोस्ट काय
अजून किती मुस्कटदाबी? रुपालीताई हीच निर्णयाची वेळ; अंधारेंची पोस्ट काय.
जरांगेंच्या भेटीनंतर बजरंग सोनावणे म्हणाले, त्यांची तब्येत नाजूक पण...
जरांगेंच्या भेटीनंतर बजरंग सोनावणे म्हणाले, त्यांची तब्येत नाजूक पण....
मुंबईकरांसाठी पावसासंदर्भात मोठी अपडेट, IMD चा अंदाज, पुढील तीन दिवस..
मुंबईकरांसाठी पावसासंदर्भात मोठी अपडेट, IMD चा अंदाज, पुढील तीन दिवस...
ठाकरेंविरोधात संदीप देशपांडे विधानसभा लढणार? मनसेकडून ग्रीन सिग्नल
ठाकरेंविरोधात संदीप देशपांडे विधानसभा लढणार? मनसेकडून ग्रीन सिग्नल.
बाळांनो... माझी शपथ तुम्हाला; पंकजा ताईचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन
बाळांनो... माझी शपथ तुम्हाला; पंकजा ताईचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन.
राज्यसभेचा खासदार कोण? सुनेत्रा पवार की छगन भुजबळ? दादांची NCP पेचात
राज्यसभेचा खासदार कोण? सुनेत्रा पवार की छगन भुजबळ? दादांची NCP पेचात.
एक चुटकी की किंमत अन् दादा VS दादा भिडले तर संजय राऊतांचे खोचक चिमटे
एक चुटकी की किंमत अन् दादा VS दादा भिडले तर संजय राऊतांचे खोचक चिमटे.
दादांमुळे भाजपची ब्रँडव्हॅल्यू घटली? संघाच्या मुखपत्रातून BJPला खडेबोल
दादांमुळे भाजपची ब्रँडव्हॅल्यू घटली? संघाच्या मुखपत्रातून BJPला खडेबोल.