नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई 30 सप्टेंबर रोजी 12 वीच्या विशेष परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच 30 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता जाहीर करणार आहे. विशेष मूल्यांकन सूत्रानुसार जाहीर करण्यात आलेल्या निकालावर समाधानी नसलेल्या, खासगी आणि श्रेणी सुधारणा करण्यासाठी बोर्डाने घेतलेल्या ऑफलाइन विशेष परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर होईल. सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in. Cbse.gov.in वर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.