CBSE Result : सीबीएसईकडून दहावी टर्म 1 परीक्षेचा निकाल जाहीर, निकाल कुठं उपलब्ध होणार?

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या पहिल्या टर्मचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मात्र, दहावीच्या विद्यार्थ्यांना यावेळी वेबसाईटवर निकाल पाहता येणार नाही.

CBSE Result : सीबीएसईकडून दहावी टर्म 1 परीक्षेचा निकाल जाहीर, निकाल कुठं उपलब्ध होणार?
CBSE
Image Credit source: CBSE
| Edited By: | Updated on: Mar 12, 2022 | 5:39 PM

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) दहावीच्या पहिल्या टर्मचा (Class 10 term 1 Result) निकाल जाहीर करण्यात आला आहे. मात्र, दहावीच्या विद्यार्थ्यांना यावेळी वेबसाईटवर निकाल पाहता येणार नाही. सीबीएसईकडून दहावीचे निकाल शाळांकडे पाठवण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांनी निकालासाठी शाळांकडे (School) संपर्क केल्यास त्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. दहावीच्या निकालामध्ये विद्यार्थ्यांचे विषय निहाय गुण जारी करण्यात आलेले आहेत. सीबीएसईनं यानंतर एक परिपत्रक जारी केलं आहे. दहावी टर्म परीक्षा 1 चा निकाल वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार नाही. सीबीएसईकडून विद्यार्थ्यांचे निकाल शाळांकडे पाठवण्यात आले आहेत.

बारावीच्या निकालाकडे लक्ष

सीबीएसईकडून टर्म 1 परीक्षेच्या निकालासाठी मार्कशीट किंवा उत्तीर्ण प्रमाणपत्र जारी करण्यात येणार नाही. टर्म 1 परीक्षा आणि टर्म 2 परीक्षेचा निकाल एकत्रितपणे मार्कशीटवर जारी केले जातील. सीबीएसईनं नव्या शिक्षण धोरणानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन टर्म घेण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीच्या टर्म 1 परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा होती. दहावीच्या टर्म 1 परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून आता बारावीच्या टर्म 1 परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.

एएनआयचं ट्विट

दहावी बारावी टर्म 2 परीक्षेची डेट शीट जाहीर

सीबीएसईकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर आता बारावीच्या टर्म 1 चा निकाल कधी जाहीर होणार याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. 11 मार्चला सीबीएसईकडून डेटशीट जारी करण्यात आले आहेत. दहावी आणि बारावीच्या सत्र 2 च्या परीक्षांचं वेळापत्रक सीबीएसईकडून जाहीर करण्यात आलं होतंय

इतर बातम्या:

CBSE : दहावी बारावी संदर्भात सीबीएसईकडून मोठी घोषणा, दुसऱ्या टर्म परीक्षेच्या तारखा जाहीर

NEET PG Revised Cut Off : नीट पीजी परीक्षेचा निकाल पुन्हा जाहीर होणार, आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय