Google मुळे ‘UPSC’च्या विद्यार्थ्यांना बसला मोठा फटका, परीक्षेपासून..
एक हैराण करणारा प्रकार पुढे आलाय. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा फटका बसलाय. हेच नाही तर वर्षभर केलेली मेहनत विद्यार्थ्यांची वाया गेलीये. यामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. आज देशभरात UPSC परीक्षा पार पडतंय. 25 विद्यार्थ्यांना या परीक्षेपासून वंचित राहावे लागले.

नुकताच एक हैराण करणारा प्रकार पुढे आलाय. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा फटका बसलाय. हेच नाही तर वर्षभर केलेली मेहनत विद्यार्थ्यांची वाया गेलीये. यामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. आज देशभरात UPSC परीक्षा पार पडतंय. UPSC ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चक्क गूगल मॅपच्या चुकीमध्ये काही विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आलीये. तब्बल 20 ते 25 विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आलीये. या सर्व प्रकारानंतर आता विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय.
छत्रपती संभाजीनगरमध्ये गुगल मॅपवर चुकीचे परीक्षा सेंटर लोकेशन दाखवण्यात आले. विद्यार्थी चुकीच्या ठिकाणी पोहचले. ज्यावेळी विद्यार्थ्यांना ही चूक लक्षात आली, तोपर्यंत खूप उशीर झाला आणि विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. 25 विद्यार्थ्यांसोबत हा प्रकार घडलाय.
परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना जे हॉलतिकीट देण्यात आले होते. त्यावर विवेकानंद कला, सरदार दिलीपसिंह वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर असा पत्ता देण्यात आला. मात्र, हा पत्ता गूगल मॅपवर टाकला असता त्याचे लोकेशन थेट वाळूज एमआयडीसीमध्ये दाखवत होते.
विद्यार्थी वाळूज एमआयडीसीमध्ये पोहचले. मात्र, तिथेच गेल्यावर विद्यार्थ्यांच्या लक्षात आले की, आपण चुकीच्या ठिकाणी आलो आहोत. यावेळी काही विद्यार्थ्यांनी चाैकशी केली असता हे परीक्षा केंद्र छत्रपती संभाजीनगरमध्येच असल्याचे लक्षात आले. परंतू तोपर्यंत उशीर झाला होता.
यासर्व गोंधळामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आली. प्रत्यक्षात केंद्रावर जाण्यास विद्यार्थ्यांना उशीर झाला आणि त्यांना परीक्षेस बसता आले नाही. आता UPSC परीक्षा परत देण्यासाठी या विद्यार्थ्यांना अजून काही दिवस वाट पाहावी लागेल. या प्रकारामुळे विद्यार्थी निराश झाल्याचे बघायला मिळाले.
हे पहिल्यांदा झाले नाही की, गूगलकडून लोकेशन चुकीचे दाखवले गेले. अनेकदा गूगलकडून लोकेशन चुकीचे दाखवले जाते. यामुळे बऱ्याचदा सल्ला दिला जातो की, गूगल लोकेशनवर पूर्ण विश्वास न ठेवता, रस्त्याने जाताना लोकांना देखील संबंधित पत्ता विचारायला हवा. आता गूगल लोकेशनच्या चुकीमध्ये या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसलाय.