AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi School | देशातली पहिली व्हर्चुअल शाळा सुरु, गल्लीत रहा, दिल्लीचं शिका… केजरीवालांच्या नव्या शाळेतल्या सुविधा काय?

Delhi Virtual School | सुरुवातीच्या टप्प्यात इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंत व्हर्चुअल क्लास सुरु केले जातील. यासाठीची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. विशेष म्हणजे देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून विद्यार्थी या शाळेत प्रवेश घेऊ शकतात.

Delhi School | देशातली पहिली व्हर्चुअल शाळा सुरु, गल्लीत रहा, दिल्लीचं शिका... केजरीवालांच्या नव्या शाळेतल्या सुविधा काय?
अरविंद केजरीवालImage Credit source: twitter
| Updated on: Aug 31, 2022 | 1:33 PM
Share

नवी दिल्लीः दिल्लीतल्या शैक्षणिक धोरणाचा संपूर्ण देशात, जगात गाजावाजा होतो. याच दिल्लीतून आता एक अशी शाळा सुरु झाली आहे, ज्यात कुणीही अॅडमिशन (Admission) घेऊ शकतो. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी पहिल्या व्हर्चुअल शाळेची (Virtual School) सुरुवात केली आहे. देशाच्या कोणत्याही काना-कोपऱ्यात राहून तुम्ही या शाळेत शिकू शकता. सुरुवातीच्या टप्प्यात ईयत्ता 9वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग या शाळेत सुरु करण्यात येतील. यासाठीची प्रवेश प्रक्रिया आजपासूनच सुरु झाली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकतीच एका पत्रकार परिषदेत यासंबंधीची घोषणा केली. व्हर्चुअल स्कूल दिल्ली बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशनद्वारे या शाळेला मान्यता मिळेल. या शाळेतून JEE-NEET साठीचे विद्यार्थी तयार होतील, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केलाय.

अरविंद केजरीवाल काय म्हणाले?

कोरोना काळात अनेक शाळांनी व्हर्चुअल वर्ग चालवले. त्यातूनच या शाळा सुरु करण्याची प्रेरणा मिळाल्याचं अरविंद केजरीवाल यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितलं. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षपणे शाळेत गेले पाहिजे, मात्र काहीजण शाळेत पोहोचू शकत नाही. अशा मुलांचे बालपण हिरावले जाते. अशा विद्यार्थ्यांसाठीच ही शाळा सुरु करण्यात आल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं.

शाळेच्या सुविधा काय?

  1.  संपूर्ण देशभरातून कोठूनही या शाळेत प्रवेश घेता येईल.
  2.   व्हर्चुअल शाळेत प्रवेशासाठी www.DMVS.ac.in या वेबसाइटवर अर्ज करता येईल.
  3. सुरुवातीला 9वी ते 12 वी चे वर्ग सुरु केले जातील.
  4. आठवी पास झालेले विद्यार्थी या शाळेत प्रवेश घेऊ शकतात.
  5. शाळेचे नाव दिल्ली मॉडल व्हर्चुअल स्कूल असे आहे.
  6. या शाळेत शिक्षणाव्यतिरिक्त इतर स्पर्धा परीक्षांची तयारीही करून घेतली जाईल.
  7. या शाळेत प्रत्यक्ष शिक्षणाची सोय नसेल.
  8.  सर्व इयत्तांचे वर्ग फक्त ऑनलाइन असतील.
  9. ऑनलाइन वर्गांचे रेकॉर्डिंग केले जाईल. विद्यार्थी त्यांच्या वेळेनुसार रेकॉर्डेड क्लासही पाहू शकतील.
  10. या ऑनलाइन शाळेत एक डिजिटल लायब्ररी असेल.
  11. मुलांना कोणत्याही व्हर्चुअल क्लासमध्ये जॉइन करण्याची परवानगी असेल.
  12. शाळेतील कोर्स, प्रवेश प्रक्रिया तसेच वर्गांची माहिती लवकरच अॅडमिशनच्या पोर्टलवर दिली जाईल, असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.