GATE 2022 Answer Key Declared : गेट परीक्षेची उत्तर तालिका जाहीर, स्कोअरकार्ड 21 मार्चला मिळणार

| Updated on: Mar 17, 2022 | 9:25 PM

आयआयटी खरगपूर निकालासोबत अंतिम उत्तरतालिका देखील जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांना गेटच्या पोर्टलला भेट देऊन त्यांच्या लॉगीनमधून निकाल आणि उत्तर तालिका पाहता येतील.

GATE 2022 Answer Key Declared : गेट परीक्षेची उत्तर तालिका जाहीर, स्कोअरकार्ड 21 मार्चला मिळणार
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: tv9
Follow us on

GATE 2022 Result Declared नवी दिल्ली: देशातील अनेक विद्यार्थी ज्या गेट परीक्षेच्या (Exam) निकालाची वाट पाहत होते तो निकाल अखेर जाहीर झालाय. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी खरगपूरनं (IIT Kharagpur) गेट परीक्षेचा निकाल (GATE 2022 Result) जाहीर केल्यानंतर उत्तर तालिका देखील जाहीर केली आहे. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना आपला निकाल आणि उत्तरतालिका पाहण्यासाठी संस्थेची अधिकृत वेबसाईट gate.iitkgp.ac.in. येथे भेट द्यावी लागेल. निकाल आणि उत्तरतालिका आज जाहीर झाली असून विद्यार्थ्यांना त्यांच स्कोअर कार्ड 21 मार्चपासून डाऊनलोड करता येणार आहे. आयआयटी खरगपूर निकालासोबत अंतिम उत्तरतालिका देखील जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांना गेटच्या पोर्टलला भेट देऊन त्यांच्या लॉगीनमधून निकाल आणि उत्तर तालिका पाहता येतील.

गेट उत्तरतालिका कशी डाऊनलोड करायची?

स्टेप 1 : आयआयटी खरगरपूरची अधिकृत वेबसाईट gate.iitkgp.ac.in. भेट द्या
स्टेप 2 : गेट 2022 चा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड द्वारे लॉगीन करा
स्टेप 3 : यानंतर तुम्हाला उत्तरतालिका डाऊनलोड करण्यासंदर्भातील लिंक उपलब्ध होईल.
स्टेप 4 : यानंतर तुम्हाला आयआयटी खरगपूरच्या वेबसाईटवर उत्तर तालिका उपलब्ध होईल.

निकाल कसा पाहाल?

स्टेप 1 :आयआयटी खरगरपूरची अधिकृत वेबसाईट gate.iitkgp.ac.in. भेट द्या
स्टेप 2 : गेटच्या लिंकवर क्लिक करा
स्टेप 3 : तुमचा गेट नोंदणी क्रमांक किंवा इमेल आयडी आणि पासवर्ड टाका
स्टेप 4 : सबमिट बटणावर क्लिक करा
स्टेप 5 :GATE 2022 चा निकाल तुमच्या स्क्रिनवर दिसेल
स्टेप 6 : हा निकाल डाऊनलोड करा आणि प्रिंट काढा

गेट परीक्षा उत्तीर्ण होऊन विद्यार्थी देशातील एनआयटी, आयआयटी, आयआयआयटी मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकतात. देशभरातील या नामांकित संस्था त्यांची स्वतंत्र कट ऑफ जाहीर करतात. यामुळं प्रत्येक उमेदवाराला क्वालिफाईंग मार्कसोबत कट ऑफ देखील पार करावं लागतं. ज्या उमेदवारांनी गेट परीक्षेत किमान गुण मिळवले आहेत ते परदेशात देखील शिक्षणासाठी जाऊ शकतात. सिंगापूर आणि जर्मनी सारख्या देशात देखील गेट उत्तीर्ण विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात.

इतर बातम्या :

Virar | Holi साठी वर्गणी मागायला गेले, घरात मृतदेह पाहून हादरले! पत्नीची हत्या करुन पती फरार!

कोरोनाचा संसर्ग आणि व्हायरसला रोखण्यासाठी गायीचं दूध अत्यंत उपयुक्त! नव्या संशोधनानं चकीत करणारी माहिती समोर