Virar | Holi साठी वर्गणी मागायला गेले, घरात मृतदेह पाहून हादरले! पत्नीची हत्या करुन पती फरार!

Virar | Holi साठी वर्गणी मागायला गेले, घरात मृतदेह पाहून हादरले! पत्नीची हत्या करुन पती फरार!
पत्नीची हत्या करुन पती फरार!
Image Credit source: TV9 Marathi

Virar Murder : वर्गणी गोळा करण्यासाठी इन्द्रेशकुमार यांच्या घरी ते गेले. तेव्हा राहत्या घरात एक मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळल्यानं सगळ्यांना धक्का बसला.

विजय गायकवाड

| Edited By: सिद्धेश सावंत

Mar 17, 2022 | 9:10 PM

विरार : एकीकडे सगळीकडे होळीची (Holi Celebration) लगबग सुरु आहे. अशातच होळीच्या दिवशीच खळबळजनक घटना समोर आली आहे. विरारमध्ये (Arnala, Virar) एकानं आपल्या पत्नीची हत्या (Husband killed wife) केली असल्याचं उघडकीस आलं आहे. विरारच्या अर्नाळामध्ये घडलेल्या या घटनेनं एकच खळभळ उडाली आहे. विरारमधील अर्नाळ्याच्या एसटी पाडा परिसरातील एका चाळीत ही घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पत्नीची हत्या करुन पती फरार झाला आहे. पत्नीचा जीव घेतल्यानंतर पती आपल्या दोन लहान मुलींना घेऊन फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आता पोलिस अधिक तपास करत आहेत. मात्र संपूर्ण विरार शहर या घटनेनं हादरुन गेलंय. निर्जल शितलप्रसाद असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. या महिलेचं वय 29 वर्ष होतं. तर या महिलेच्या पतीचं नाव इन्द्रेशकुमार असं आहे.

…आणि सगळेच हादरले!

विरारमध्ये घडलेली ही घटना ज्या प्रकारे उघडकीस आहे, तेही हादरवणारं आहे. होळीनिमित्त संपूर्ण देशासह विरारमध्ये लगबग सुरु होती. होळीच्या आयोजनासाठी विरारच्या अर्नाळा परिसरात एसटी पाडा येथील चाळीतील लोक वर्गणी गोळा करत होते. यावेळी वर्गणी गोळा करण्यासाठी इन्द्रेशकुमार यांच्या घरी ते गेले. तेव्हा राहत्या घरात एक मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळल्यानं सगळ्यांना धक्का बसला.

यानंतर अधिक तपास केल्यानंतर निर्जला शितलप्रसाद या 29 वर्षीय महिलेची पतीनं हत्या केली असल्याचं सांगितलं जातंय. या हत्येनंतर पतीनं आपल्या दोन लहान मुलींसह पळ काढलाय. पत्नी हत्या केल्यानंतर पतीनं नेमका कुठे पळ काढला आहे, याचा शोध लावण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय.

हत्या करणारा मूळचा यूपीतला

इन्द्रेशकुमार हे मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी असून ते विरारमध्ये राहत होते. विरारमध्ये मजुरीचं काम करत करणाऱ्या इंद्रेशनचं आपल्याच पत्नीची हत्या का केली, याचं उत्तर मिळू शकलेलं नाही. मात्र कौटुंबीक वादातून ही हत्या करण्यात आली असावी, असा संशय व्यक्त केला जातो आहे.

संबंधित बातम्या :

नशीब वेळीच गाडीबाहेर पडले, नाहीतर…? Holi साठी यवतमाळहून वर्ध्याला भररस्त्यात अग्नितांडव

पैठणीच्या माहेरघरात 3 महाराणी पैठणींची चोरी! महिला चोर CCTV कॅमेऱ्यात कैद

अर्धवट जळलेल्या तरुणीच्या मृतदेहाचं गूढ उकललं! आत्महत्या केल्याचं उघड, का दिला जीव?

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें