AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Government Scholarship: अखिल भारतीय शिष्यवृत्ती, ‘असा’ करा अर्ज! गुणवंत मुलांना या योजनेचा लाभ

या योजनेत दरवर्षी पहिली ते पदवीपर्यंत शासनाकडून रक्कम दिली जाते. अखिल भारतीय शिष्यवृत्तीच्या मदतीने विद्यार्थी उच्च शिक्षण पूर्ण करू शकतात.

Government Scholarship: अखिल भारतीय शिष्यवृत्ती, 'असा' करा अर्ज! गुणवंत मुलांना या योजनेचा लाभ
Educational LoanImage Credit source: indianexpress.com
| Updated on: Aug 14, 2022 | 3:23 PM
Share

इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या किंवा पदवी (Degree) प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक शासकीय शिष्यवृत्ती योजना चालवल्या जातात. या शिष्यवृत्ती योजनांमध्ये अनेक योजना असून त्यासाठी अर्ज प्रक्रिया लवकरच बंद होणार आहे. अशा परिस्थितीत ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत यासाठी अर्ज करता आलेला नाही, ते अधिकृत संकेतस्थळ – scholarships.gov.in भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. आर्थिक अडचणींमुळे अभ्यास सोडून जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती खूपच उपयुक्त ठरली आहे. या योजनेत दरवर्षी पहिली ते पदवीपर्यंत शासनाकडून रक्कम दिली जाते. अखिल भारतीय शिष्यवृत्तीच्या मदतीने विद्यार्थी उच्च शिक्षण पूर्ण करू शकतात. गरीब कुटुंबातील गुणवंत मुले या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या शिष्यवृत्तीच्या मदतीने विद्यार्थ्यांना चांगल्या विद्यापीठांत (Universities), कॉलेजांमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळते. जाणून घेऊयात या शिष्यवृत्तीसाठी (Scholarships) अर्ज कसा करावा.

अर्ज कसा करावा

  • सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळ – scholarships.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल.
  • त्यानंतर स्कॉलरशिपशी संबंधित योजना पोर्टलवर सुरू होतील.
  • पुढच्या पानावर तुमच्यासमोर एक ॲप्लिकेशन फॉर्म उघडेल.
  • फॉर्ममध्ये विचारलेली काही महत्त्वाची माहिती भरावी लागते.
  • त्यानंतर बँकेशी संबंधित सर्व माहिती भरा.
  • यानंतर लॉगइन आणि त्यानंतर मोबाइल नंबरवर ओटीपीचा पर्याय येईल.
  • यानंतर तुमच्यासमोर शिष्यवृत्तीचा फॉर्म येईल.
  • आता विचारलेली माहिती भरा.
  • त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

या शिष्यवृत्तीसाठी करा अर्ज

  • अल्पसंख्याकांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना 30 सप्टेंबर 2022 पर्यंत खुली आहे.
  • अल्पसंख्याकांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत खुली आहे.
  • मेरिट म्हणजे व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती सीएस ओपन 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत खुली आहे.
  • बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती 30 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज करू शकते.

निवड कशी होणार?

राष्ट्रीय स्तरावरील या शिष्यवृत्तीत गुणवत्तेवर आधारित पहिल्या २०० गुणवंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा व मुलाखतीतील कामगिरीच्या आधारे ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. वेबसाइटवरील शिष्यवृत्तीनुसार अभ्यासक्रम आणि मिळालेल्या रकमा सांगण्यात आल्या आहेत शिष्यवृत्ती देणाऱ्या सर्वच संस्था सर्वांसाठी शिष्यवृत्ती देत नाहीत. संस्थेने ठरविलेली टक्केवारी गाठणारे विद्यार्थी . त्या गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.