
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ने ICAI CA जानेवरी परीक्षा 2026 ची डेटशीट जाहीर केली आहे. या डेटशीटमध्ये अंतिम, इंटरमिजिएट आणि फाउंडेशन कोर्सेसच्या परीक्षेच्या तारखा देण्यात आल्या आहेत. परीक्षेला बसणारे उमेदवार ICAI च्या अधिकृत वेबसाइट icai.org वर जाऊन संपूर्ण वेळापत्रक तपासू शकतात. वेळापत्रकानुसार, गट 1 साठी अंतिम अभ्यासक्रम परीक्षा5, 7 आणि 9 जानेवारी 2026 रोजी तर गट 2 साठी 11, 13 आणि 6 जानेवारी 2026 रोजी परीक्षा पार पडणार आहे.
इथे चेक करा डेटशीट
तर ग्रुप 1 साठी इंटरमिजिएट कोर्सची परीक्षा 6,8 आणि 10 जानेवारी 2026 रोजी आणि गट 2 साठी 12, 15 आणि 17 जानेवारी 2026 या तारखांना होणार हे. तसेच फाउंडेशन कोर्सची परीक्षा 18, 20, 22 आणि 24 जानेवारी 2026 रोजी होईल. आंतरराष्ट्रीय कर-मूल्यांकन परीक्षा 13 आणि 16 जानेवारी 2025 रोजी होईल आणि विमा आणि जोखीम व्यवस्थापन तांत्रिक परीक्षा 9,11, 13 आणि 16 जानेवारी 2026 रोजी होणार आहे.
दोन शिफ्टमध्ये होणार परीक्षा
फाउंडेशन परीक्षेच्या पेपर 3 आणि 4 ची वेळ ती 2 तासांची आहे. त्याचप्रमाणे, अंतिम परीक्षेचा पेपर 6 आणि आंतरराष्ट्रीय कर मूल्यांकन चाचणी (INTT—AT) चे सर्व पेपर 4 तासांचे असतील. मात्र, इतर सर्व परीक्षा 3 तासांच्या असतात. परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेतली जाईल, काहींसाठी दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आणि काही पेपरसाठी दुपारी 2 ते संध्याकाळी 6 पर्यंत वेळ असेल.
19 नोव्हेंबरपूर्वी करा अर्ज
आयसीएआय सीए जानेवारी परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया 3 नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2025 आहे. लेट फीसह ऑनलाइन परीक्षा अर्ज भरण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2025 आहे.
फाउंडेशन, इंटरमिजिएट आणि फायनल परीक्षांसाठी उमेदवारांना उत्तर देण्यासाठी इंग्रजी/हिंदी हे माध्यम निवडण्याची परवानगी असेल. अधिक माहितीसाठी, उमेदवार आयसीएआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.