AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

International Literacy Day 2022 : आज आहे जागतिक साक्षरता दिन, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व अन् इतिहास

8 सप्टेंबर रोजी जागतिक साक्षरता दिवस संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. लोकांमध्ये शिक्षणाबद्दल जागरूकता वाढावी हा, या दिवसाचा उद्देश आहे.

International Literacy Day 2022 : आज आहे जागतिक साक्षरता दिन, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व अन् इतिहास
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनImage Credit source: tv9
| Updated on: Sep 08, 2022 | 3:58 PM
Share

दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस (International Literacy Day) साजरा केला जातो. शिक्षणाचा प्रचार व्हावा, या उद्देशाने हा दिवस जगभरात साजरा केला जातो. कोणत्याही देशाच्या विकासासाठी साक्षरता (Literacy is important for any country) अत्यंत महत्त्वाची असते. देशात जेवढे जास्त लोक सुशिक्षित असतील, तेवढी देशाची प्रगती होईल. साक्षरतेचा अर्थ आणि महत्त्व लोकांना कळावे यासाठी हा दिवस साजरा केला जातो. कोरोना महामारीच्या काळातही अभ्यासाच्या पद्धतींमध्ये अनेक बदल झाले आहेत. ऑनलाइन क्लासेसद्वारे विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले. मात्र साक्षरता दिवस साजरा करण्याची सुरूवात कधी झाली, त्याचे काय महत्त्व (History and Importance) आहे आणि यावर्षीची थीम काय आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? जाणून घेऊ या याविषयीची माहिती…

साक्षरता दिवसाचा इतिहास –

साक्षरता दिन साजरा करण्याचा निर्णय युनेस्कोने 7 नोव्हेंबर 1965 रोजी घेतला होता. त्यानंतर 1966 साली पहिल्यांदा साक्षरता दिन साजरा करण्यात आला होता. हा दिवस साजरा करण्यासाठी 8 सप्टेंबर निश्चित करण्यात आला होता. तेव्हापासून दरवर्षी 8 सप्टेंबरला साक्षरता दिन साजरा केला जातो.

साक्षरता दिवसाचे महत्त्व –

शिक्षण घेणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव लोकांना व्हावी आणि शिक्षणाबद्दल जागरुकता वाढावी, हा साक्षरता दिन साजरा करण्यामागचा हेतू आहे. शिक्षण घेतले तर कोणताही माणूस जीवनात यश मिळवू शकतो. तो प्रत्येक अडचणीला सहज सामोरा जाऊ शकतो. कोणत्याही देशातील साक्षरतेचे प्रमाण अथवा साक्षरतेचा दर वाढला तर त्या देशाचाही झपाट्याने विकास होतो. देशातील प्रत्येक वर्गातील व्यक्ती शिक्षित असणे किती गरजेचे आहे, हे समजावे, यासाठी हा 8 सप्टेंबर रोजी साक्षरता दिवस साजरा केला जातो.

साक्षरता दिवस 2022ची थीम –

‘ट्रान्सफॉर्मिग लिटरसी लर्निंग स्पेस ‘ (Transforming Literacy Learning Spaces) ही या वर्षीची साक्षरता दिनाची थीम आहे

साक्षरतेवरील सुविचार –

  • एक सभ्य घरासारखी शाळा नाही आणि सभ्य पालकासारखा शिक्षक नाही – महात्मा गांधी
  • साक्षरता प्राप्त केल्याशिवाय कोणतीही व्यक्ती आपले परम ध्येय अथवा उंची साध्य करू शकत नाही – होरेस मेन
  • शिक्षण म्हणजे तुमचा राग किंवा आत्मविश्वास न गमावता जवळजवळ काहीही ऐकण्याची क्षमता (होय) – रॉबर्ट फ्रॉस्ट
  • स्वातंत्र्याचे सुवर्णद्वार खुले करण्याची साक्षरता ही गुरुकिल्ली आहे – जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.