AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयटीआयची प्राथमिक गुणवत्ता अन् अंतिम यादी ‘या’ तारखेला होणार जाहीर

महाराष्ट्रातील सर्व शासकीय आणि खासगी आयटीमधील प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली आहे. आयटीआयची प्राथमिक गुणवत्ता आणि अंतिम यादी जाहीर होण्याची तारीख जाणून घ्या..

आयटीआयची प्राथमिक गुणवत्ता अन् अंतिम यादी 'या' तारखेला होणार जाहीर
studentsImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 11, 2025 | 9:41 AM
Share

राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 27 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. आयटीआय अभ्यासक्रमाची प्राथमिक गुणवत्ता यादी 30 जून रोजी, तर अंतिम गुणवत्ता यादी 3 जुलै रोजी जाहीर होणार आहे. आयटीआय प्रवेशासाठी चार फेऱ्या राबविण्यात येणार आहेत. राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी आयटीआयमधील प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रवेशासाठी चार फेऱ्या राबविण्यात येणार असून त्यानंतर संस्थास्तरीय समुपदेशन फेरी आणि खासगी आयटीआयमधील संस्था स्तरावरील प्रवेश होणार आहेत.

या प्रक्रियेतील प्राथमिक गुणवत्ता यादी 30 जून रोजी जाहीर होणार आहे. या गुणवत्तायादीबाबत हरकती नोंदविणे आणि प्रवेश अर्जातील माहितीत बदल करण्यासाठी 30 जून ते एक जुलैपर्यंत कालावधी देण्यात आला आहे. अंतिम गुणवत्ता यादी तीन जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. पहिल्या फेरीतील निवड यादी नऊ जुलैला प्रसिद्ध होणार असून यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 10 ते 15 जुलैपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.

असं आहे ‘आयटीआय’प्रवेशाचं वेळापत्रक :

ऑनलाइन प्रवेश अर्ज करणे, अर्जात दुरुस्ती करणे, प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे : 26 जूनपर्यंत प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर करणे : 30 जून गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविणे : 30 जून ते 1 जुलै अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणे : 3 जुलै

पहिली प्रवेश फेरी

पहिल्या फेरीसाठी निवड यादी जाहीर करणे : 9 जुलै यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष प्रवेश घेणे : 10 ते 15 जुलै दुसरी प्रवेश फेरी : 10 ते 28 जुलै तिसरी प्रवेश फेरी : 23 जुलै ते 8 ऑगस्ट चौथी प्रवेश फेरी : 4 ते 19 ऑगस्ट संस्थास्तरीय समुपदेशन फेरी : 21 ते 28 ऑगस्ट खासगी आयटीआयमधील संस्था स्तरावरील प्रवेश : 10 जुलैपासून

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : https://admission.dvet.gov.in and https://www.dvet.gov.in

Follow Us
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत
'विलास घुले हत्या प्रकरणाशी कुटुंबाचा संबंध नाही'
विलास घुले हत्या प्रकरणाशी कुटुंबाचा संबंध नाही; बजरंग सोनवणे यांचा दावा, सीडीआर पुराव्यासाठी आव्हान
रिक्षाचालकांवरील मराठी सक्तीला राष्ट्रवादीचा विरोध
रिक्षाचालकांवरील मराठी सक्तीला राष्ट्रवादीचा विरोध; पारसनाथ तिवारी न्यायालयात जाणार.
झारखंड विद्यार्थी आंदोलनाचे यश. कर्मचारी निवड आयोगाची परीक्षा रद्द
झारखंड विद्यार्थी आंदोलनाचे यश. कर्मचारी निवड आयोगाची परीक्षा रद्द
तुकाराम मुंडेंच्या FDA ला हायकोर्टाचा दणका; 5 लाखांचा दंड
तुकाराम मुंडेंच्या FDA ला हायकोर्टाचा दणका; 5 लाखांचा दंड
‘एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते’; हुसेन दलवाईंचा मोठा दावा
एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते, हुसेन दलवाईंचा दावा
मनोज जरांगेंना तीन दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज
मनोज जरांगेंना डिस्चार्ज: मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटीत २९ ऑगस्ट उपोषणाची तयारी
नाशिक TCS प्रकरणातील संशयित आरोपी मतीन पटेलला जामीन
नाशिक TCS प्रकरणातील मतीन पटेलला जामीन मंजूर