आयटीआयची प्राथमिक गुणवत्ता अन् अंतिम यादी ‘या’ तारखेला होणार जाहीर

महाराष्ट्रातील सर्व शासकीय आणि खासगी आयटीमधील प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली आहे. आयटीआयची प्राथमिक गुणवत्ता आणि अंतिम यादी जाहीर होण्याची तारीख जाणून घ्या..

आयटीआयची प्राथमिक गुणवत्ता अन् अंतिम यादी या तारखेला होणार जाहीर
students
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 11, 2025 | 9:41 AM

राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 27 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. आयटीआय अभ्यासक्रमाची प्राथमिक गुणवत्ता यादी 30 जून रोजी, तर अंतिम गुणवत्ता यादी 3 जुलै रोजी जाहीर होणार आहे. आयटीआय प्रवेशासाठी चार फेऱ्या राबविण्यात येणार आहेत. राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी आयटीआयमधील प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रवेशासाठी चार फेऱ्या राबविण्यात येणार असून त्यानंतर संस्थास्तरीय समुपदेशन फेरी आणि खासगी आयटीआयमधील संस्था स्तरावरील प्रवेश होणार आहेत.

या प्रक्रियेतील प्राथमिक गुणवत्ता यादी 30 जून रोजी जाहीर होणार आहे. या गुणवत्तायादीबाबत हरकती नोंदविणे आणि प्रवेश अर्जातील माहितीत बदल करण्यासाठी 30 जून ते एक जुलैपर्यंत कालावधी देण्यात आला आहे. अंतिम गुणवत्ता यादी तीन जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. पहिल्या फेरीतील निवड यादी नऊ जुलैला प्रसिद्ध होणार असून यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 10 ते 15 जुलैपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.

असं आहे ‘आयटीआय’प्रवेशाचं वेळापत्रक :

ऑनलाइन प्रवेश अर्ज करणे, अर्जात दुरुस्ती करणे, प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे : 26 जूनपर्यंत
प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर करणे : 30 जून
गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविणे : 30 जून ते 1 जुलै
अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणे : 3 जुलै

पहिली प्रवेश फेरी

पहिल्या फेरीसाठी निवड यादी जाहीर करणे : 9 जुलै
यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष प्रवेश घेणे : 10 ते 15 जुलै
दुसरी प्रवेश फेरी : 10 ते 28 जुलै
तिसरी प्रवेश फेरी : 23 जुलै ते 8 ऑगस्ट
चौथी प्रवेश फेरी : 4 ते 19 ऑगस्ट
संस्थास्तरीय समुपदेशन फेरी : 21 ते 28 ऑगस्ट
खासगी आयटीआयमधील संस्था स्तरावरील प्रवेश : 10 जुलैपासून

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : https://admission.dvet.gov.in and https://www.dvet.gov.in