Jee Main Admit Card 2021: जेईई मेनच्या चौथ्या सत्राचं ॲडमिट कार्ड जारी, डाऊनलोड कसं करायचं?

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात येणाऱ्या JEE MAIN 2021 च्या चौथ्या सत्राची परीक्षेचे प्रवेशपत्र जारी करण्यात आलंय.26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2021 जेईई मेन चौथ्या सत्राची परीक्षा होणार आहे.

Jee Main Admit Card 2021: जेईई मेनच्या चौथ्या सत्राचं ॲडमिट कार्ड जारी, डाऊनलोड कसं करायचं?
जाणून घ्या जेईई मेनचा निकाल कधी येणार, अशा प्रकारे तपासू शकाल
| Edited By: | Updated on: Aug 22, 2021 | 11:30 AM

Jee Main Admit Card 2021 नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात येणाऱ्या JEE MAIN 2021 च्या चौथ्या सत्राची परीक्षेचे प्रवेशपत्र जारी करण्यात आलंय.26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2021 जेईई मेन चौथ्या सत्राची परीक्षा होणार आहे. विद्यार्थी प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी jeemain.nic.in आणि nta.ac.in या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात येणारी चौथ्या सत्राची जेईई मेन परीक्षा कोरोना संसर्गामुळं लांबणीवर टाकली गेली होती. ही परीक्षा जेईई मेनच्या चौथ्या सत्रातील परीक्षा 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. जवळपास 7.32 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. भारतातील 334 परीक्षा केंद्र आणि भारताबाहेरील 12 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे.

प्रवेशपत्र कसं डाऊनलोड करायचं?

स्टेप1: एनटीएनं जारी केलेल्या अधिकृत वेबसाईट nta.nic.in किंवा jeemain.nta.nic. in या वेबसाईटवर भेट द्या.
स्टेप 2 : जेईई मेन अ‌ॅडमिट कार्ड या लिंक वर क्लिक करा
स्टेप 3 : जेईई मेन साठीचा नोंदणी क्रमांक आणि इतर माहिती भरा
स्टेप 4: अॅडमिट कार्ड डाऊनलोड करुन सेव करुन ठेवा.

परीक्षा केंद्रांची संख्या वाढली

भारतातील 334 परीक्षा केंद्र आणि भारताबाहेरील 12 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. यापूर्वी भारतात 232 शहरांमध्ये परीक्षा घेतली जायची. कोरोना विषाणू संसर्गामुळे शहरांची संख्या वाढवण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या डॉ. साधना पाराशर यांनी यावेळच्या परीक्षेसाठी केंद्रांची संख्या वाढवण्यात आल्याचं सांगितलं आहे. 828 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.

मातृभाषेत परीक्षा

नव्या शिक्षण धोरणानुसार जेईई मेन 2021 सत्राची परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेसह तेलुगू, तामिळ, पंजाबी, उर्दू, ओडिशा, मराठी, मल्याळम, कन्नड, बंगाली, आमामी आणि गुजराती भाषेमध्ये घेतली जात आहे.

जेईई मेन परीक्षा

जेईई मेन ही राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा आहे. पदवीस्तरावरील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) JEE मुख्य परीक्षा आयोजित करते. यंदाच्या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेचे हे शेवटचे सत्र आहे.

इतर बातम्या:

ee Main Admit Card 2021: जेईई मेन परीक्षेची प्रवेशपत्र लवकरच जारी होणार, तिसऱ्या सत्रासाठी 20 जुलैपासून परीक्षा

JEE MAIN 2021| जेईई मेन एप्रिल मे सत्राच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

JEE Main 2021 : जेईई परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा

Jee Main Admit Card 2021 of fourth session released jee main nic in know hot to download