AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

JEE MAIN 2021| जेईई मेन एप्रिल मे सत्राच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात येणाऱ्या JEE MAIN 2021 च्या एप्रिल आणि मे सत्रासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.

JEE MAIN 2021| जेईई मेन एप्रिल मे सत्राच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
जेईई मेन्सच्या अंतिम सत्राची परीक्षा 26 ऑगस्टपासून सुरू होणार
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Mar 29, 2021 | 10:47 AM
Share

NTA JEE MAIN 2021 APPLICATION नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात येणाऱ्या JEE MAIN 2021 च्या एप्रिल आणि मे सत्रासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज केले नसतील त्यांना एनटीएकडून आणखी एक संधी देण्यात आली आहे. विद्यार्थ्याना परीक्षेसाठी अर्ज करायचा असल्यास त्यानी jeemain.nic.in या वेबसाईटला भेट देऊन नोटीस वाचावे. ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्यासाठी 4 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत 5 एप्रिल ठेवण्यात आली आहे. (JEE Main April May session application last date extended to 4 April)

B.Arch आणि B.Planning च्या विद्यार्थ्यांना विशेष सूचना

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे B.Arch आणि B.Planning च्या विद्यार्थ्यांना विशेष सूचना देण्यात आली आहे. B.Arch आणि B.Planning च्या विद्यार्थ्यांनी मे सत्रातील परीक्षेला अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कारण एप्रिल सत्रातील परीक्षा केवळ B.E. आणि B.Tech साठी पेपर आयोजित केला जाणार आहे.

अर्ज दाखल करण्यास पुन्हा मुदतवाढ नाही

विद्यार्थ्यांना 4 एप्रिलपर्यंत अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले नाहीत त्यांनी 4 एप्रिलपूर्वी अर्ज भरावेत. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी अर्ज केले आहेत, त्यांना 4 एप्रिलपर्यंत अर्जात दुरुस्ती करण्याची संधी आहे. NTA JEE Main April 2021 परीक्षा 27 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान आयोजित केली जाणार आहे. NTA JEE Main May 2021 परीक्षा 24 ते 28 मे या दरम्यान आयोजित केली जाईल. विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेशपत्र jeemain.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध होईल.

मातृभाषेत परीक्षा

नव्या शिक्षण धोरणानुसार जेईई मेन 2021 सत्राची परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेसह तेलुगू, तामिळ, पंजाबी, उर्दू, ओडिशा, मराठी, मल्याळम, कन्नड, बंगाली, आमामी आणि गुजराती भाषेमध्ये घेतली जात आहे.

संबंधित बातम्या

JEEAdvanced 2021 परीक्षेची तारीख ठरली, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा

IPL 2021 | लवकरच चौकार षटकार, आयपीएलच्या 14 व्या मोसमाची तारीख जवळपास निश्चित

(JEE Main April May session application last date extended to 4 April)

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा