Jee Main Admit Card 2021: जेईई मेन परीक्षेची प्रवेशपत्र लवकरच जारी होणार, तिसऱ्या सत्रासाठी 20 जुलैपासून परीक्षा

| Updated on: Jul 11, 2021 | 6:17 PM

एप्रिल सत्रातील जेईई मेन परीक्षा कोरोना संसर्गामुळं लांबणीवर टाकली होती. एप्रिल महिन्यात होणारी ही परीक्षा जेईई मेनच्या तिसऱ्या सत्रातील परीक्षा 20 जुलै ते 25 जुलै दरम्यान होणार आहे.

Jee Main Admit Card 2021: जेईई मेन परीक्षेची प्रवेशपत्र लवकरच जारी होणार, तिसऱ्या सत्रासाठी 20 जुलैपासून परीक्षा
जेईई मेन्सची अंतिम उत्तर की जारी, येथे करा डाउनलोड
Follow us on

Jee Main Admit Card 2021 नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात येणाऱ्या JEE MAIN 2021 च्या एप्रिल सत्राची परीक्षा 20 जुलै ते 25 जुलै दरम्यान होणार आहे. बी. टेक, बी.ई. बी. आर्क या अभ्यासक्रमांसाठी ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे.विद्यार्थी प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी jeemain.nic.in आणि nta.ac.in या वेबसाईटला भेट देऊ शकतात. (Jee Main Admit Card 2021 of third session released soon know hot tow download )

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे B.Arch आणि B.Planning च्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी एप्रिल सत्रातील जेईई मेन परीक्षा कोरोना संसर्गामुळं लांबणीवर टाकली होती. एप्रिल महिन्यात होणारी ही परीक्षा जेईई मेनच्या तिसऱ्या सत्रातील परीक्षा 20 जुलै ते 25 जुलै दरम्यान होणार आहे.

प्रवेशपत्र कसं डाऊनलोड करायचं?

स्टेप1: एनटीएनं जारी केलेल्या अधिकृत वेबसाईट nta.nic.in किंवा jeemain.nta.nic. in या वेबसाईटवर भेट द्या.
स्टेप 2 : जेईई मेन अ‌ॅडमिट कार्ड या लिंक वर क्लिक करा
स्टेप 3 : जेईई मेन साठीचा नोंदणी क्रमांक आणि इतर माहिती भरा
स्टेप 4: अॅडमिट कार्ड डाऊनलोड करुन सेव करुन ठेवा

मातृभाषेत परीक्षा

नव्या शिक्षण धोरणानुसार जेईई मेन 2021 सत्राची परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेसह तेलुगू, तामिळ, पंजाबी, उर्दू, ओडिशा, मराठी, मल्याळम, कन्नड, बंगाली, आमामी आणि गुजराती भाषेमध्ये घेतली जात आहे.

जेईई मेन परीक्षा 2021 च्या चौथ्या सत्रासाठी नोंदणी

जेईई मेन परीक्षा 2021 च्या चौथ्या सत्रासाठी नोंदणी सुरु झाली आहे. जेईई मेन परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी नॅशनल टेस्टींग एजन्सीची वेबसाईट jeemain.nta.nic.in या वेबसाईटवर अर्ज करु शकतात. जे विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करु इच्छितात ते 12 जुलैपूर्वी अर्ज दाखल करु शकतात.

इतर बातम्या:

JEE MAIN 2021| जेईई मेन एप्रिल मे सत्राच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

JEE Main 2021 : जेईई परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा

(Jee Main Admit Card 2021 of third session released soon know hot tow download )