JEE Main 2021 Result Toppers | जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर, 17 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण

| Updated on: Aug 07, 2021 | 12:21 AM

जेईई मेन तिसऱ्या सत्राचा निकाल (JEE Main 2021 Result declared) नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत तब्बल 17 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत.

JEE Main 2021 Result Toppers | जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर, 17 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण
JEE Main
Follow us on

मुंबई : जेईई मेन तिसऱ्या सत्राचा निकाल (JEE Main 2021 Result declared) नुकताच जाहीर झाला आहे. एनटीएनं 20, 22, 25 आणि 27 जुलै रोजी जेईई मेन परीक्षा तिसऱ्या सत्राची परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेत तब्बल 17 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण (JEE Main 2021 Result Toppers) मिळवले आहेत. (jee main result 2021 declared total 17 students scored 100 percentile know toppers list)

 100 टक्के गुण मिळवणाऱ्या टॉपर्सची नावे

कर्णम लोकेश, दुग्गीनेनी वेंकट पनीश, आंध्र प्रदेशातील पासला वीरा शिवा आणि कांचनपल्ली राहुल नायडू, वैभव विशाल (बिहार), अंशुल वर्मा (राजस्थान), रुचिर बन्सल आणि प्रवर कटारिया ( दिल्ली), हर्ष आणि अनमोल, गौरब (हरियाणा) दास, पोलू लक्ष्मी साई लोकेश रेड्डी (कर्नाटक), मदुर आदर्श रेड्डी आणि वेलावली वेंकट (तेलंगणातून) आणि उत्तर प्रदेशातून पाल अग्रवाल आणि अमैया सिंघल या विद्यार्थ्यांनी जेईई मेनच्या तिसऱ्या सत्रातील परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवले आहेत.

जेईई मेनचा निकाल कसा पाहायचा?

स्टेप 1: निकाल तपासण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर भेट द्या.

स्टेप 2: वेबसाइटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

स्टेप 3: तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करून लॉगिन करा.

स्टेप 4: तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

स्टेप 5: निकाल डाऊनलोड करुन त्याची प्रिंट आऊट घ्या

मातृभाषेत परीक्षा

नव्या शिक्षण धोरणानुसार जेईई मेन तिसऱ्या सत्राची परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेसह तेलुगू, तामिळ, पंजाबी, उर्दू, ओडिशा, मराठी, मल्याळम, कन्नड, बंगाली, आमामी आणि गुजराती भाषेमध्ये घेतली गेली आहे. विद्यार्थ्यांना यंदा प्रथमच त्यांच्या मातृभाषेत परीक्षा देण्याची संधी मिळाली होती. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट अशा पद्धतीनं घेतली गेली.

इतर बातम्या :

JEE Main 2021 Result declared : जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर, jeemain.nta.nic.in वर पाहा तुमचा रिझल्ट

मोठी बातमी ! राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु होणार, वर्षा गायकवाड यांची माहिती

Urmila Nimbalkar : मराठमोळी अभिनेत्री-युट्युबर उर्मिला निंबाळकरच्या आयुष्यात हिरोची एण्ट्री

(jee main result 2021 declared total 17 students scored 100 percentile know toppers list)