Urmila Nimbalkar : मराठमोळी अभिनेत्री-युट्युबर उर्मिला निंबाळकरच्या आयुष्यात हिरोची एण्ट्री

ही गोड बातमी शेअर करताच उर्मिलावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. सध्या तिनं फक्त ही बातमी शेअर केली असून बाळाचा फोटो मात्र शेअर केलेला नाहीये. (Hero's entry in the life of Actress-YouTuber Urmila Nimbalkar)

1/5
मराठमोळी अभिनेत्री-युट्युबर उर्मिला निंबाळकर (Urmila Nimbalkar) गेले अनेक दिवस तिच्या गर्भारपणाचा आनंद लुटत होती. अभिनेत्री उर्मिला सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. आता तिच्या आयुष्यात हिरोची एण्ट्री झाली आहे.

2/5
सोशल मीडियावर तिनं एक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. तिनं लिहिलं, ‘माझ्या आयुष्यात 3 ऑगस्टला सकाळी हिरोची एण्ट्री झाली आहे.’

3/5
ही गोड बातमी शेअर करताच उर्मिलावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. सध्या तिनं फक्त ही बातमी शेअर केली असून बाळाचा फोटो मात्र शेअर केलेला नाहीये.

4/5
मराठीसह हिंदी मालिका विश्वात चमकणारी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर आता युट्युबर म्हणून देखील प्रसिद्ध झाली आहे. उर्मिलाने अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.

5/5
तिने तिच्या प्रत्येक भूमिकेतून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. ‘दुहेरी’ या मालिकेत तिने ‘मैथिली’ ही प्रमुख भूमिका केली होती. तसंच, तिने ‘दिया और बाती हम’, ’मेरी आशिकी तुमसे ही’ या मालिकांमध्येही काम केले आहे. याबरोबरच तिने संगीत सम्राट या कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी देखील उत्तम पेलली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI