AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

JEE Main Result 2022 Declared: जेईई मेन मध्ये 100 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची एनटीएकडून जाहीर! वाचा 14 टॉपर्सची नावं

JEE Main Result 2022 Declared: यावर्षी 14 विद्यार्थ्यांनी जेईई मेन सेशन 1 च्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळवले आहेत. जेईई मेन सेशन-1 परीक्षेत 100 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये तेलंगणातील 4, आंध्र प्रदेशातील 3 विद्यार्थी आहेत. त्याच वेळी, हरियाणा, झारखंड, पंजाब, आसाम, राजस्थान, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमधून 1-1 उमेदवारांचा समावेश आहे. त्यात आसामच्या गुवाहाटी शहरातील स्नेहा पारीकच्या नावाचाही समावेश आहे.

JEE Main Result 2022 Declared: जेईई मेन मध्ये 100 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची एनटीएकडून जाहीर! वाचा 14 टॉपर्सची नावं
NEET PG allotmentImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jul 11, 2022 | 2:14 PM
Share

JEE Main Result 2022 Declared: देशातील प्रमुख अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेण्यात येणाऱ्या JEE Mains सत्र 1 परीक्षेचा निकाल आज म्हणजेच 11 जुलै 2022 रोजी जाहीर झाला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर निकाल जाहीर केला आहे. परीक्षेला बसलेले विद्यार्थी त्यांचा रोल नंबर आणि जन्मतारीख यांच्या मदतीने निकाल (JEE Mains 2022) तपासू शकतात. निकालासोबतच एनटीएने टॉपर्सची (JEE Main 2022 Toppers)यादीही जाहीर केली आहे. यावर्षी 14 विद्यार्थ्यांनी जेईई मेन सेशन 1 च्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळवले आहेत. जेईई मेन सेशन-1 परीक्षेत 100 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये तेलंगणातील 4, आंध्र प्रदेशातील 3 विद्यार्थी आहेत. त्याच वेळी, हरियाणा, झारखंड, पंजाब, आसाम, राजस्थान, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमधून 1-1 उमेदवारांचा समावेश आहे. त्यात आसामच्या गुवाहाटी शहरातील स्नेहा पारीकच्या नावाचाही समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी 300 पैकी 300 गुण मिळवले आहेत.

एकूण 14 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण

  1. जस्ति यशवंत वी वी एस – तेलंगणा
  2. सार्थक माहेश्वरी- हरियाणा
  3. अनिकेत चट्टोपाध्याय- तेलंगणा
  4. धीरज कुरुकुंडा- तेलंगणा
  5. कोय्याना सुहास- आंध्र प्रदेश
  6. कुशाग्र श्रीवास्तव – झारखंड
  7. मृणाल गर्ग – पंजाब
  8. स्नेहा पारीक- आसाम
  9. नव्या- राजस्थान
  10. पेनिकालपति रवि किशोर- आंध्र प्रदेश
  11. पॉलिसेट्टी कार्तिकेय- आंध्र प्रदेश
  12. बोया हरेन सात्विक- कर्नाटक
  13. सौमित्र गर्ग – उत्तर प्रदेश
  14. रूपेश बियाणी- तेलंगणा

JEE Main निकाल कसा तपासायचा ?

  • निकाल पाहण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जा.
  • वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावरील लेटेस्ट अपडेट जा.
  • यानंतर JEE मुख्य सत्र 1 अंतिम निकाल 2022 च्या लिंकवर जा.
  • पुढील पानावर अर्ज क्रमांक आणि पासवर्ड/जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
  • तुम्ही लॉग इन करताच, रिझल्ट स्क्रीनवर दिसेल.
  • निकाल तपासल्यानंतर त्याची प्रिंट नक्कीच घ्या.

निकाल तपासण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे

JEE मुख्य सत्र 2,30 जुलै रोजी संपत आहे आणि निकाल देखील ऑगस्टच्या 7 दिवसात अपेक्षित आहे. आज निकाल जाहीर झाल्यानंतर प्रत्येक राज्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या विद्यार्थ्यांची यादी तसेच 100 टक्के विद्यार्थ्यांची यादी एनटीएकडून शेअर केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं त्यानुसार ही यादी जाहीर करण्यात आली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...