ताप चढलाय, नाक वाहतंय, 2-4 दिवसांची सुटी द्या, शाळा बंद थोडी पडतेय? विद्यार्थ्याचा रजेचा अर्ज पाहिला?

| Updated on: Nov 09, 2022 | 12:24 PM

आपल्या भावना अगदी मनापासून लिहिल्या की त्या किती भावतात, हेच या विद्यार्थ्याने दाखवून दिलंय.

ताप चढलाय, नाक वाहतंय, 2-4 दिवसांची सुटी द्या, शाळा बंद थोडी पडतेय? विद्यार्थ्याचा रजेचा अर्ज पाहिला?
Image Credit source: social media
Follow us on

नवी दिल्लीः रजेचा अर्ज (Leave Application) लिहायचा म्हटलं की अनेकांना घरच्यांची, मित्रांची मदत घ्यावी लागते. औपचारिक भाषा, औपचारिक कारणं वापरत कसा बसा अर्ज लिहिला जातो. पण जेव्हा रजेचा अर्ज अगदी मनापासून लिहिला असेल तर त्यातून लिहिणाऱ्याच्या भावना किती खऱ्या आहेत, हेही कळतं. सोशल मीडियावर व्हायरल होतोय असाच एक रजेचा अर्ज. तो लिहिलाय अस्सल बुंदेलखंडी भाषेत (Bundelkhand Language). एका IAS अधिकाऱ्याने (IAS Officer) तो शेअर केलाय. त्यावरून नेटकऱ्यांनी शाळेच्या दिवसांच्या आठवणी काढून प्रतिक्रियांचा पाऊसच पाडलाय.

आयएएस अधिकारी अर्पित वर्मा यांनी ट्विटरवर ही पोस्ट शेअर केली आहे. हा मजकूप छापीलच आहे. पण एका विद्यार्थ्याचा तो रजेचा अर्ज असल्याचं पोस्टमध्ये म्हटलंय.

ही पोस्ट खरी आहे, असं मानलं तर तो लिहिणारा विद्यार्थी बुंदेलखंडचा आहे. देशी भाषेतच खऱ्या भावना मांडून त्याने वाचकांची मनं जिंकली आहेत.

आपल्या भाषेत रजा मागताना त्याने लिहिलंय…..
तो मास्साब, ऐसो है कि दो दिना से चड रओ है जो बुखार… उपर से जा नाक बह रई सो अलग. जई के मारे हम सकूल नई आ पाहे सो तमाए पाऊ पर के निवेदन आए कि दो-चार दिना कि छुट्टी दे देते तो बडो अच्छा रहतो..

या अर्जाचा शेवट तर एवढा मजेशीर आहे की शिक्षकांना तो वाचून सैरावैरा पळावं वाटलं असेल…

त्याने लिहिलंय… भले ही मैं स्कूल आऊं या न आऊं, कौन सा स्कूल बंद हो जाएगा.. आपका कलुआ..’

IAS अधिकाऱ्याच्या या पोस्टवर प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडतोय. हसणाऱ्या इमोजींचे भरपूर रिप्लाय आले. तर एका यूझरनं लिहिलंय… वाह जी वाह क्या गजब का पंच मारा है…
तर दुसऱ्याने कलुआ तू खरच बोलतोयस… तुझ्या न येण्याने शाळा खरच बंद पडणार नाही…
तर एकाने थोडी नाराजी दर्शवली… ‘इत्तो मजाक न उडाओ सर जी हमारे बुंदेलखंड को’ तर कुणी आपल्या भाषेच्या आठवणीने खुश झाले. जय बुंदेलखंडीचे नारे लगावलेत…