Maharashtra Board 12th Result 2024 LIVE : 12 वीचा निकाल जाहीर, गुण पडताळणीची मुदत कधीपर्यंत ?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी हे या परीक्षेच्या निकालाच्या प्रतिक्षेत होते. अखेर आज निकाल जाहीर झाला. यंदा मुलींनी निकालात बाजी मारली आहे. कोकणचा निकाल सर्वाधिक तर मुंबईचा सर्वात कमी निकाल लागला.

Maharashtra Board 12th Result 2024 LIVE : 12 वीचा निकाल जाहीर, गुण पडताळणीची मुदत कधीपर्यंत ?
| Updated on: May 21, 2024 | 1:18 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी हे या परीक्षेच्या निकालाच्या प्रतिक्षेत होते. अखेर आज निकाल जाहीर झाला. 12  वीचा निकाल एकूण 93.37% लागला आहे. यंदा मुलींनी निकालात बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 95.44 टक्के आहे तर मुलांचा निकाल 91.60 इतका लागला. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 3.84 टक्क्यांनी जास्त आहे.

दुपारी १ वाजता अधिकृत संकेतस्थळांवर निकाल जाहीर झाला असून विद्यार्थी तेथे त्यांचा निकाल, गुण चेक करू शकतात. 1 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत यंदा 12वीच्या परीक्षा झाल्या. यंदाच्या निकालात कोकण विभाग अव्वल ठरला. तर मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला.

गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी निकालाची वाट बघत होते. अखेर आज निकाल जाहीर झाला असून एकूण १३ लाख ८७ हजार १२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.  विशेष म्हणजे तुम्ही इयत्ता बारावीचा निकाल https://www.tv9marathi.com/ या संकेतस्थळाला भेट देऊन पाहू शकता.

विभागीय निकाल

यंदा 12 वीच्या परीक्षेत कोकणाचा निकाल सर्वाधिक लागला. कोकण विभागाचा निकाल 97.51 टक्के तर मुंबईचा सर्वात कमी 91.95 टक्के इतका लागला.

पुणे 94.44 टक्के

नागपूर 92.12 टक्के

संभाजी नगर 94.08टक्के

मुंबई 91.95  टक्के(सर्वात कमी)

कोल्हापूर 94.24 टक्के

अमरावती 93 टक्के

नाशिक 94.71 टक्के

लातूर 92.36

कोकण 97.51 टक्के (सर्वात जास्त)

 

मार्क्स व्हेरिफिकेशनची मुदत किती ?

22मे 2024 ते 5 जून 2024 पर्यंच विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी (verification) किंवा उत्तर पत्रिकेची फोटोकॉपी घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. या 15दिवसांत विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने पैसे भरून अर्ज करता येणार आहे. त्यासाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा युपीआय पद्धतीचा वापर करता येईल.

 

Maharashtra HSC RESULT