HSC Result website : दहावीच्या निकालावेळी ठेच, 12 वीच्या निकालासाठी धडा, बोर्डाकडून 4 नव्या वेबसाईट जारी

इयत्ता दहावीच्या निकालावेळी सर्व्हर डाऊन झाल्याने हजारो विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता आला नाही. (Maharashtra Board HSC Result on August 3 at 4 pm, 4 new site launched)

HSC Result website : दहावीच्या निकालावेळी ठेच, 12 वीच्या निकालासाठी धडा, बोर्डाकडून 4 नव्या वेबसाईट जारी
सांकेतिक फोटो

पुणे: इयत्ता दहावीच्या निकालावेळी सर्व्हर डाऊन झाल्याने हजारो विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता आला नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता. या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी जाहीर होणाऱ्या इयत्ता 12वीच्या निकालासाठी बोर्डाने चार नव्या वेबसाईट्स सुरु केल्या आहेत. त्यामुळे एकाच संकेतस्थळावर लोड येणार नसून विद्यार्थ्यांना निकाल पाहणं सोपं जाणार आहे. (Maharashtra Board HSC Result on August 3 at 4 pm, 4 new site launched)

आज मंगळवारी दुपारी 4 वाजता इयत्ता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना साईटवरून रिझल्ट डाऊनलोड करूनही घेता येणार आहे. निकाल लागल्यावर विद्यार्थी एकाच साईटवर जाऊन निकाल पाहतात. त्यामुळे एकाचवेळी साईटवर लोड आल्याने सर्व्हर डाऊन होतो. परिणामी निकाल पाहता येत नाही. विद्यार्थ्यांची ही गैरसोय होऊ नये म्हणून परीक्षा मंडळाने चार साईट्स लॉन्च केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक साईट्सवर निकाल पाहता येणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही.

निकाल पाहण्यासाठी या संकेतस्थळांना भेट द्या

1. https://hscresult.11 thadmission.org.in

2. https://msbshse.co.in

3. hscresult.mkcl.org

4. mahresult.nic.in. 

www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

असे मिळणार गुण

2021 मध्ये आयोजित करण्यात आलेली 12वीची परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आली होती. त्यामुळे मूल्यमापन कार्यपध्दती व तरतूदीनुसार व 10 वीमध्ये सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण, 11 वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण व 12 वीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच 12वी चे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण इत्यादींच्या आधारे 12 वी साठी भारांशानुसार उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे. सदर गुणदान विचारात घेवून मंडळाने विहित कार्यपध्दतीनुसार सदर परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केलेली आहे.

2 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार सन 2021मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) परीक्षेस श्रेणीसुधार योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. सदर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना पुढील एक /दोन संधी उपलब्ध राहतील. (Maharashtra Board HSC Result on August 3 at 4 pm, 4 new site launched)

 

संबंधित बातम्या:

Maharashtra HSC Result 2021: बारावीच्या निकालाची तारीख ठरली, उद्या दुपारी 4 वाजता निकाल जाहीर होणार

Maharashtra HSC Result 2021 | बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, कसा आणि कुठे पाहाल ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra News Live Update : पुण्यातील तुळशीबाग मार्केटमध्ये खरेदीसाठी पुणेकरांची तुफान गर्दी

(Maharashtra Board HSC Result on August 3 at 4 pm, 4 new site launched)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI