Maharashtra HSC Result 2021 | बारावीचा निकाल दुपारी 4 वाजता जाहीर होणार, कसा आणि कुठे पाहायचा ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Board HSC 12th Exam Result 2021 Date and Time | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाच्या इयत्ता बारावीचा निकाल आज दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहे.

Maharashtra HSC Result 2021 | बारावीचा निकाल दुपारी 4 वाजता जाहीर होणार, कसा आणि कुठे पाहायचा ? जाणून घ्या संपूर्ण माहिती
hsc-student

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाच्या इयत्ता बारावीचा निकाल (HSC Result 2021)   दुपारी 4 वाजता  जाहीर होणार आहे. सध्याच्या कोरोनास्थितीमुळे बारावीचा निकाल हा अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे आपला निकाल काय लागेल याची विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली आहे. निकाल पाहण्यासाठी बोर्डाने एकूण चार नव्या वेबसाईट जारी केल्या आहेत. विद्यार्थ्यांना या अधिकृत वेसबाईट्सवर त्यांचा निकाल पाहता येणार आहे.

विद्यार्थ्यांनो या वेबसाईट्सवर तुमचा निकाल पाहा 

इयत्ता बारावीचा निकाल आज दुपारी चार वाजता लागणार असून तो ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाईल. त्यासाठी एकूण चार वेबसाईट्स जारी करण्यात आल्या आहेत. या वेसबाईट्स खालीलप्रमाणे आहेत.

1.  https://hscresult.11thadmission.org.in

2. https://msbshse.co.in

3. hscresult.mkcl.org

4. mahresult.nic.in

www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

बारावीचा निकाल कसा पाहाल ?

💠निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.

💠त्यानंतर तुम्हाला HSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.

💠त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.

💠त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव रेश्मा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच RES असे लिहावे लागेल.

💠यानंतर लगेचच तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर पाहाता येईल

💠निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील गुणांना सर्वाधिक वेटेज

बारावी निकालासंदर्भात जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाला सर्वाधिक वेटेज दिलं गेलं आहे. बारावी निकाल जाहीर करण्यासाठी महाविद्यायांना या शासन निर्णयाचा आधार घ्यावा लागणार आहे. बारावीच्या परीक्षेला बसलेले खासगी विद्यार्थी, पुन्हा परीक्षा देणारे विद्यार्थी यांच्यासाठी वेगळा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. त्यासंबंधी अधिक माहिती शासन निर्णयात पाहायला मिळेल

इतर बातम्या :

Maharashtra HSC Result 2021: बारावीच्या निकालाची तारीख ठरली, उद्या दुपारी 4 वाजता निकाल जाहीर होणार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI