Maharashtra HSC Result 2021: बारावीच्या निकालाचं काम करण्यास मुदतवाढ द्या, शिक्षक संघटनांची वर्षा गायकवाड यांच्याकडे मागणी

बोर्डानं 16 जुलै रोजी दहावीचा निकाल जाहीर केला. त्यानंतर अकरावीच्या प्रवेशाच्या सीईटीची तारीख जाहीर केली आहे. आता, सर्वांना बारावीच्या निकालाचे वेध लागले आहेत.

Maharashtra HSC Result 2021: बारावीच्या निकालाचं काम करण्यास मुदतवाढ द्या, शिक्षक संघटनांची वर्षा गायकवाड यांच्याकडे मागणी
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 31, 2021 | 3:20 PM

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं 16 जुलै रोजी दहावीचा निकाल जाहीर केला. त्यानंतर अकरावीच्या प्रवेशाच्या सीईटीची तारीख जाहीर केली आहे. आता, सर्वांना बारावीच्या निकालाचे वेध लागले आहेत. मात्र, बारावीच्या शिक्षकांना निकालाचे काम करण्यासाठी चार दिवस वाढवून द्यावेत, अशी मागणी शिक्षक संघटनांनी शालेय शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड शिक्षकांच्या मागणीवर काय निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे.

गुण नोंदवण्याची मुदत 4 दिवस वाढवण्याची मागणी

महाराष्ट्र शासनाने बारावीच्या शिक्षकांना 21 जुलैपर्यंत मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये विषय निहाय गुण भरण्याची मुदत दिलेली आहे. परंतु हा कालावधी अपुरा असल्यामुळे त्यांना चार दिवसाचा कालावधी वाढवून देण्यात यावा, अशी मागणी मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सरचिटणीस प्राध्यापक मुकुंद आंधळकर यांनी केली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड शिक्षकांच्या मागणीवर काय निर्णय घेतात, हे पाहावं लागणार आहे.

बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला नेमका काय?

महाराष्ट्र सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. शालेय शिक्षण विभागानं शासन निर्णय काढून बारावी निकालाचा फॉर्म्युला प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्र सरकारनं बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेला आहे. दहावी साठी 30 टक्के, अकरावी साठी 30 टक्के आणि बारावीसाठी 40 टक्के अशी विभागणी करण्यात आली आहे.

निकाल कसा लावणार

इयत्ता 10 वीच्या गुणांना 30 टक्के भारांश

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यानं सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरले जातील.

इयत्ता अकरावी 30 टक्के भारांश

इयत्ता अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण

इयत्ता बारावीसाठी 40 टक्के भारांश

बारावीच्या वर्गासाठी 40 टक्के बारांश निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये प्रथम सत्र निहाय परीक्षा, सराव परीक्षा , सराव चाचण्या आणि तस्तम मूल्यमापन यामधील विषय निहाय गुण यावर विद्यार्थ्यांना गुण दिले जातील.

बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील गुणांना सर्वाधिक वेटेज

बारावी निकालासंदर्भात जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाला सर्वाधिक वेटेज दिलं गेलं आहे. बारावी निकाल जाहीर करण्यासाठी महाविद्यायांना या शासन निर्णयाचा आधार घ्यावा लागणार आहे. बारावीच्या परीक्षेला बसलेले खासगी विद्यार्थी, पुन्हा परीक्षा देणारे विद्यार्थी यांच्यासाठी वेगळा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. त्यासंबंधी अधिक माहिती शासन निर्णयात पाहायला मिळेल.

इतर बातम्या:

CBSE Private Exam 2021: सीबीएसईकडून बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांच्या परीक्षेची घोषणा, परीक्षेला ‘या’ तारखेपासून सुरुवात

CBSE 12th Result 2021 : बारावीच्या निकालासंदर्भात सीबीएसईची महत्वाची नोटीस, येथे पाहा

Maharashtra HSC Result 2021 teachers demanded for extension for complete result work of class 12th result

Non Stop LIVE Update
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.