MHT CET Toppers list : एमएचटी सीईटीच्या टॉपर्समध्ये पुण्याच्या 4 तर मुंबईच्या 8 विद्यार्थ्यांची बाजी

| Updated on: Oct 28, 2021 | 11:34 AM

कोल्हापूरमधील तपन चिकनीस आणि मुंबईतील दिशी विंची यांनी पीसीएम तर नांदेडमधील फातेमा आयमन आणि अनिरुद्ध अनिवळे यांनी पीसीबी ग्रुपमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. पुण्यातील चार विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत.

MHT CET Toppers list : एमएचटी सीईटीच्या टॉपर्समध्ये पुण्याच्या 4 तर मुंबईच्या 8 विद्यार्थ्यांची बाजी
EXAM
Follow us on

पुणे: महाराष्ट्रातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल बुधवारी सायंकाळी जाहीर झाला. एमएचटी सीईटी परीक्षेत राज्यातील 28 विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. या परीक्षेला 4 लाख 14 हजार 968 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पीसीएम ग्रुपमधील 11 तर पीसीबी ग्रुपमधील 17 विद्यार्थ्यांनी पीसीबी ग्रुपमील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कोल्हापूरमधील तपन चिकनीस आणि मुंबईतील दिशी विंची यांनी पीसीएम तर नांदेडमधील फातेमा आयमन आणि अनिरुद्ध अनिवळे यांनी पीसीबी ग्रुपमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. पुण्यातील चार विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत.

पुण्याच्या 4 तर मुंबईच्या 8 विद्यार्थ्यांनी मिळवले 100 पर्सेंटाईल गुण

पीसीएम म्हणजेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या गटातील 11 विद्यार्थ्यांनी 100 टक्के पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. तर, पीसीबी म्हणजेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र गटातील 17 विद्यार्थ्यांनी पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. पुण्यातील आदित्य मेहता, प्राजक्ता कदम, शुभम बेनके, ज्ञानेश्वरी राऊत यांनी टॉपर्सच्या यादीत स्थान पटकावलं आहे. तर, विंची दिशी दिपेश, मंकोजिया अर्श अजिजभाई, नीरजा विश्वनाथ पाटील, हर्ष शाह, कृष्णा शाह, राजवीर लाखानी, कल्याणी कुडाळकर, कृष्णप्रिया आर नम्बोथिरी या मुंबईतील विद्यार्थ्यांनी टॉपर्सच्या यादीत स्थान पटकावलं आहे.

पीसीएम ग्रुप टॉपर्स लिस्ट

  1. चिकनीस तपनतपन अविनाश, कोल्हापूर
  2. वेदांत विकास चंदेवार, नागपूर
  3. विंची दिशी दिपेश, मुंबई उपनगर,
  4. हर्ष शाह, मुंबई शहर
  5. मंकोजिया अर्श अजिजभाई, मुंबई उपगनर
  6. सुगदरे सचिन गणेश, सातारा
  7. पाजाई स्नेहा रावसाहेब, अमरावती
  8. नीरजा विश्वनाथ पाटील, मुंबई उपनगर,
  9. आदित्य मेहता, पुणे
  10. खांडेलवाल जानम रमेशभाई, ठाणेॉ
  11. कृष्णा शाह, मुंबई उपनगर

पीसीबी ग्रुप टॉपर्स

  1. आयमन फतेमा, नांदेड,
  2. अनिवले अनिवरुद्ध, नांदेड
  3. राजवीर लाखानी, मुंबई उपनगर
  4. कल्याणी कुडाळकर, मुंबई उपनगर
  5. प्राजक्ता कदम, पुणे
  6. अशनी जोशी, नागपूर
  7. पाटील मोहित, नाशिक,
  8. झोपे सर्वेश, जळगाव
  9. थोरात आदर्श, सांगली
  10. कृष्णप्रिया आर नम्बोथिरी, मुंबई शहर
  11. प्राची धोटे, अकोला
  12. शुभम बेनके, पुणे
  13. जेनिका कऱ्हाळे, लातूर
  14. निकाता मौर्य, ठाणे
  15. गायत्री नायर, ठाणे,
  16. ज्ञानेश्वरी राऊत, पुणे,
  17. तन्वी संतोष गहूकर, अकोला

एमएचीटी सीईटी परीक्षेचा निकाल कसा पाहायचा?
स्टेप 1: महाराष्ट्र CET च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
स्टेप 2: होम पेजवर तुम्हाला MHT CET स्कोअर कार्डची लिंक मिळेल.
स्टेप 3 : नवीन पेज उघडेल. येथे दिलेल्या जागेत तुमचा रोल नंबर आणि पासवर्ड (जन्मतारीख) यासारखी आवश्यक माहिती भरून लॉग-इन करा.
स्टेप 4: तुम्ही लॉग इन करताच तुमचा निकाल आणि स्कोअर कार्ड स्क्रीनवर पाहायला मिळेल.

 इतर बातम्या:

Maharashtra MHT CET Result 2021 : एमएचटी सीईटीच्या निकालात 28 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल गुण, नांदेड कोल्हापूर आणि मुंबईचा डंका

Maharashtra MHT CET Result 2021 : एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर, रिझल्ट कुठं पाहायचा?
Maharashtra MHT CET 2021 toppers list eleven candidates in pcm and seventeen students get 100 percentile in pcb group